नांदेडला स्टेट बँकेचे विभागीय कार्यालय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:23+5:302021-05-30T04:16:23+5:30
स्टेट बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयीकृत बँक असून ही देशातील सर्वाधिक विस्तार असलेली बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व ...

नांदेडला स्टेट बँकेचे विभागीय कार्यालय मंजूर
स्टेट बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयीकृत बँक असून ही देशातील सर्वाधिक विस्तार असलेली बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा, शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो, तसेच बचतीच्या योजना राबविल्या जातात. गृह कर्जाच्या क्षेत्रातही ही बँक आघाडीवरील आहे. देशाचे अर्थमंत्री असताना डॉ. शंकरराव चव्हाण यांनी १९८८ मध्ये नांदेड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय कार्यालय मंजूर करून घेतले होते. त्यानंतर आता पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे विभागीय कार्यालय आणले आहे. एसबीआयचे विभागीय कार्यालय नांदेडला आल्याने आता २ कोटींहून अधिक कर्जाच्या मंजुरीचे निर्णय नांदेडमध्येच घेतले जाणार असून प्रशासकीय दृष्टिकोनातूनदेखील ही बाब उपयुक्त ठरणार आहे.