संथ गतीने लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST2021-05-29T04:15:19+5:302021-05-29T04:15:19+5:30
मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ९ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. ...

संथ गतीने लसीकरण सुरू
मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ९ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, कौठा, सिडको व जंगमवाडी या ८ केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत तर देशमेश हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सिनचे १५० डोस उपलब्ध केले आहेत.
शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली व भोकर या १६ केंद्रावर कोविशिल्डचे प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर व मांडवी या केंद्रावर कोव्हॅक्सिनचे ५०डोस, ग्रामीण रुग्णालय माहूर या केंद्रावर कोव्हॅक्सिनेच ३० डोस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध केले आहेत.
जिल्ह्यात २७ मेपर्यंत एकूण ४ लाख २० हजार ५१७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर २८ मे पर्यंत कोविड-१९ लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे ३ लाख ८६ हजार ३३० डोस, कोव्हॅक्सिनचे एक लाख ८ हजार ८६० डोस याप्रमाणे एकूण ४ लाख ९५ हजार १९० डोस प्राप्त झाले आहेत.
हे सर्व डोस ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या १२ ते १६ आठवडे म्हणजेच सुमारे ८४ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर ४५ वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सिन ही लस ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील ४५ वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.