शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवित लुबाडणाऱ्या टोळीला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:40 IST

या प्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पॉकेटमनीसाठी ते चो-या करीत असल्याचे उघडकीस आले आहे़

नांदेड : शहरातील वजिराबाद भागात एका युवकाला चाकूचा धाक दाखवित दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी लुबाडले होते़ या प्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पॉकेटमनीसाठी ते चो-या करीत असल्याचे उघडकीस आले आहे़२७ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास राधेगोविंद रुग्णालयासमोर आनंदा विठ्ठलराव सावरकर हे रिक्षाची वाट पाहत असताना दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी त्यांना अडविले़ सावरकर यांना चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडून रोख २२०० रुपये, एटीएम, आधार कार्ड काढून घेतले होते़ याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात वजिराबाद व स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु होता़ १ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला खब-याकडून माहिती मिळाली़ त्यानुसार हा गुन्हा शिवप्रसाद ऊर्फ सॅन्डी बोडके रा़बायपास रोड याने इतर साथीदारांच्या मदतीने केला असल्याच्या खबरीवरुन पोनि़सुनील निकाळजे यांनी पथकाला सूचना दिल्या़ सपोनि पांडुरंग भारती यांनी पथकासह शोध घेतला़ त्यात शिवप्रसाद ऊर्फ सॅन्डी लक्ष्मण बोडके, राणा भगवानसिंग ठाकूर रा़ब-यामसिंग नगर, गौरव दीपक येलमेवाड रा़ब-यामसिंगनगर, अनिल सुरेश पवार राग़ोविंदनगर, आकाश उमाकांत ठाकरे रा़आनंदनगर व गणेश गंगाधर शिंदे रा़लोणी खु़ता़अर्धापूर या सहा जणांना ताब्यात घेतले़ आरोपींना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ तसेच शहरातील आनंदनगर, बाबानगर, व्हीआयपी रोड, डीमार्ट, मालेगाव रोड, शिवमंदिर रोड भागात चाकूचा धाक दाखवून अनेकांना लुबाडल्याची कबुली दिली़ या पथकात पोउपनि के़ बी़ नेहरकर, सपोउपनि जसवंतसिंह शाहू, एएसआय रमेश खाडे, पोहेकॉ़ कुलकर्णी, पांगरेकर, शेख जावेद आदींचा समावेश होता़

  • स्थानिक गुन्हे शाखेने यातील राणा ठाकूर यास यापूर्वीही अटक केली होती़ त्यावेळी त्याने नऊ मंदिरात चोरी केल्याचे तसेच एक दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली होती़ पॉकेटमनीसाठी गुन्हे करीत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले़या सर्व आरोपींना वजिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीNanded policeनांदेड पोलीस