शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या संपाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 18:00 IST

परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ ऐन आषाढी एकादशी यात्रेदरम्यान एसटी कर्मचारी संपावर जातील, अशी धास्ती एसटी प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देवेतनवाढ समाधानकारक न झाल्याने एसटी कर्मचारी संप पुकारतील, असा अंदाज एसटी प्रशासनाने लावला आहे़

नांदेड : परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ ऐन आषाढी एकादशी यात्रेदरम्यान एसटी कर्मचारी संपावर जातील, अशी धास्ती एसटी प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पत्र काढून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत़ 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा संघर्ष अजूनही कायम असून योग्य वेतनवाढ मिळण्याची खदखद कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे़ त्यामुळे आषाढी एकादशी यात्रेदरम्यान पुन्हा एकदा संप पुकारून एसटी प्रशासन आणि परिवहनमंत्र्यांना धक्का देण्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे़ काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वयंघोषित संप पुकारून प्रशासनासह प्रवाशांना वेठीस धरले होते़ एसटी प्रशासन आणि एसटी कर्मचारी संघटनांमध्ये वाटाघाटी होवून संप मागे घेण्यात आला होता़

परंतु, परिवहनमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना कंत्राटी म्हणून काम करण्याचा दिलेला सल्ला आणि वेतनवाढ समाधानकारक न झाल्याने एसटी कर्मचारी संप पुकारतील, असा अंदाज एसटी प्रशासनाने लावला आहे़ त्यानुसार एसटी प्रवाशांना, विशेषत: पंढरपूर यात्रेतील भाविक वारकऱ्यांना कुठलाही त्रास होवू नये म्हणून वेळीच खबरदारी म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश विभाग नियंत्रकांना दिले आहेत़ यात्रा कालावधीत कोणी कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेतला तर त्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, वेळप्रसंगी गृहरक्षक, पोलीस विभागाची मदत घेण्याचे पत्रात म्हटले आहे़  

इंटक वारकऱ्यांच्या सेवेतआषाढी एकादशी यात्रेत ग्रामीण भागातील वारकरी सहभागी असतात़ त्यामुळे या कालावधीत संपावर जाण्याचा अथवा संप पुकारण्याचा प्रश्नच येत नाही़ कोणी कर्मचारी अथवा एखाद्या संघटनेने संप पुकारला तर त्यास आमचा पाठिंबा राहणार नाही़ उलट यात्रा कालावधीत वारकºयांची सेवा देण्यासाठी वेळप्रसंगी आम्ही २४ तास एसटीच्या कर्तव्यावर राहू़ परंतु, वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल़ - पी़ आऱ इंगळे (विभागीय अध्यक्ष,महाराष्ट्र एसटी वर्कर्स इंटक, नांदेड़) 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार