शिवराज बिचेवारलोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसने ८१ पैकी ७३ जागा जिंकून एकहाती विजय मिळविला होता, परंतु गेल्या आठ वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे मनपाची सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपालाही मनपावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोर लावावा लागेल.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपात गेल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण ९० अंशाच्या कोनात बदलले आहे. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष गळ्यात गळे घालून लढले होते. परंतु नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत मित्रपक्षातील नेत्यांनीच एकमेकांचे वाभाडे काढत स्वबळाचा नारा दिला होता. आता महापालिकेच्या निवडणुकीतही महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची भाषा करीत आहेत. तर दुसरीकडे अवसान गळालेली काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सत्ताधारी पक्षांसमोर कितपत आव्हान उभे करते, हे पहावे लागेल.
एकूण प्रभाग किती आहेत? - २०
एकूण सदस्य संख्या किती? - ८१
कोणते मुद्दे निर्णायक?
१. शहरात अरुंद रस्ते आणि अतिक्रमणामुळे नांदेडकर हैराण झाले आहेत. त्यातच रस्ते केल्यानंतर काही महिन्यातच ते खोदण्याचा सपाटा सुरू आहे.
२. विष्णुपुरी प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही शहराला तीन ते चार दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येतो. उन्हाळ्यात अनेक भागात टैंकर धावतात.
३. शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी प्रत्यक्षात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
भाजप - ०६
शिवसेना - ०१
राष्ट्रवादी काँग्रेस - ००
काँग्रेस - ७३
मनसे - ००
इतर - ०१
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती?
एकूण - ३,९६,८७२
पुरुष - २,०६,४२१
महिला - १,९०,४०८
इतर - ४३
आता एकूण किती मतदार?
एकूण - ५,१७,८३९
पुरुष - २,७१,०६९
महिला - २,४६,६६६
इतर - १०४
अंतिम यादी २० रोजी
प्रारुप यादीवर ३४८ आक्षेप असून ७हजार ५८६ दुबार मतदार असल्याचा आरोप आहे. आता अंतिम मतदार यादी २० डिसेंबरला जाहीर होणार आहे.
Web Summary : Nanded faces a crucial municipal election. The ruling Congress faces a tough challenge after Ashok Chavan's BJP move. The Mahayuti alliance shows cracks, hinting at independent fights. Key issues include poor roads, water scarcity, and waste management will decide the victor.
Web Summary : नांदेड़ में महत्वपूर्ण नगर निगम चुनाव है। अशोक चव्हाण के भाजपा में जाने के बाद सत्तारूढ़ कांग्रेस को कड़ी चुनौती का सामना करना पड़ रहा है। महायुति गठबंधन में दरारें दिख रही हैं, जिससे स्वतंत्र लड़ाई के संकेत मिल रहे हैं। खराब सड़कें, पानी की कमी और कचरा प्रबंधन जैसे मुद्दे विजेता तय करेंगे।