नांदेड ते हिमाचल प्रदेश विशेष गाडी धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:19 IST2021-07-31T04:19:33+5:302021-07-31T04:19:33+5:30

गाडी संख्या ०५४२७ हुजूर साहिब नांदेड ते अम्ब अन्दौरा विशेष एक्स्प्रेस ३ ऑगस्टपासून ही गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे ...

A special train will run from Nanded to Himachal Pradesh | नांदेड ते हिमाचल प्रदेश विशेष गाडी धावणार

नांदेड ते हिमाचल प्रदेश विशेष गाडी धावणार

गाडी संख्या ०५४२७ हुजूर साहिब नांदेड ते अम्ब अन्दौरा विशेष एक्स्प्रेस ३ ऑगस्टपासून ही गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी ११.०५ वाजता सुटेल. पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, भोपाल, मथुरा, न्यू दिल्ली, अंबाला केंट, साहिबजादा अजित सिंघ नगर, नांगलडेम, उना हिमाचल मार्गे हिमाचल प्रदेशातील अम्ब अन्दौरा येथे बुधवारी सायंकाळी ५.५० वाजता पोहोचेल.

गाडी संख्या ०५४२८ अम्ब अन्दौरा ते हुजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस ५ ऑगस्टपासून ही गाडी अम्ब अन्दौरा येथून दर गुरुवारी दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि उना हिमाचल, नांगलडेम, साहिबजादा अजित सिंघ नगर, अंबाला केंट, न्यू दिल्ली, मथुरा, भोपाल, खांडवा, अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा मार्गाने हुजूर साहिब नांदेड येथे शुक्रवारी रात्री ९.४० वाजता पोहोचेल.

सदर गाडी पूर्ण आरक्षित असेल. या गाडीत १६ डबे असतील.

४. या गाडीमध्ये प्रवास करताना केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दिलेले कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक असेल.

Web Title: A special train will run from Nanded to Himachal Pradesh