शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जनसंपर्क असणाऱ्यांचे विशेष सर्वेक्षण; कोरोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 11:05 IST

दुसरी लाट येण्यामध्येही सुपर स्प्रेडर व्यक्ती महत्वाची भूमिका बजावू शकतात

ठळक मुद्देरुग्णालयेही होताहेत सुसज्जफ्ल्यूसदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण

नांदेड : कोरोनाची दुसरी लाट जानेवारी,फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी सर्वांनाच विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. प्रशासनानेही पुन्हा लाट येवू नये यासाठी उपाययोेजना करण्यास सुरुवात केली आहे. विविध व्यावसायाच्या निमित्ताने जनसंपर्क तसेच सामाजिक संपर्क अधिक असणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. दुसरीकडे आरोग्य व्यवस्थाही सज्ज ठेवण्यात येत आहे. 

दुसरी लाट येण्यामध्येही सुपर स्प्रेडर व्यक्ती महत्वाची भूमिका बजावू शकतात हे लक्षात घेवून प्रशासनातर्फे किराणा दुकानदार, भाजीवाले तसेच पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे छोटे-मोठे विक्रेते, हॉटेल मालक आणि वेटर्स आदींचे सर्वेक्षण करुन त्यांची प्राधान्याने कोविड तपासणी करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. याबरोबरच घरगुती काम करणाऱ्या व्यक्ती, मजूर, वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर, कंडक्टर, हाऊसिंग सोसायटीमधील सुरक्षा रक्षक तसेच आवश्यक सेवा परविणारे शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांचे सर्वेक्षण करुन काेविड तपासणी करण्याचा व काेविडचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दुसरीकडे रुग्ण सेवा सुरळित मिळावी यासाठीही आढावा घेवून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.यासाठीची कृती योजना तयार करण्यात आली आहे. कोविडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी प्रयोगशाळा नमुन्यामधील पॉझिटिव्ह रुग्णांचे शेकडा प्रमाण किती आहे यानुसार सतर्कतेचे इशारे लक्षात घेवून त्यानुसार रुग्णोपचार सुविधा कार्यान्वित करण्यास सांगण्यात आले आहे.

फ्ल्यूसदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षणदुसरी लाट येवू नये असा प्रयत्न आहे. या अनुषंगाने फ्ल्यूसदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत फिवर क्लिनीक यांची या सर्वेक्षणात महत्वाची भूमिका आहे. याबरोबरच एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमंतर्गत ग्रामीण भागातील प्राथिमक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांच्याकडून इन्फ्ल्यूंझा सदृश्य रुग्णांच्या आठवडी अहवालाचे अवलोकन नियमितपणे होवून साप्ताहिक ट्रेंड समजावून घेण्यात येत आहे. याच पद्धतीचे सर्वेक्षण शहरी भागात मनपातर्फे करण्यात येत आहे. तसेच गृहभेटीद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

औषधांचा बफर स्टॉक ठेवण्याचे निर्देशकोविडचा प्रादुर्भाव ज्या कालावधीमध्ये सर्वाधिक होता त्यावेळी लागणारी औषधे आणि साधन सामुग्री लक्षात घेवून त्याच्या किमान ५० टक्के औषधे नेहमी उपलब्ध असतील याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पुढील १५ दिवसांचा औषध व साधन सामुग्री स्टॉक बफर स्टॉक म्हणून ठेवण्यात येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट येवूच नये यासाठी प्रशासनाबरोबच नागरिकांनीही प्रयत्न करायला हवेत. संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागासह यंत्रणा कामाला लागली आहे. नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा. हातांची स्वच्छता सातत्याने करावी. तसेच दाेन व्यक्तीमध्ये शारीरिक अंतर ठेवावे. - डॉ.विपिन इटणकर जिल्हाधिकारी, नांदेड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेडmedicineऔषधं