शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

सासूकडून सुनेचा भोसकून खून

By admin | Updated: April 30, 2017 00:22 IST

वालोपे येथील घटना; सुरीने छातीवर सपासप ३० वार

चिपळूण : तालुक्यातील वालोपे-देऊळवाडी येथे सासूनेच सुनेच्या छातीत सुरीने २५ ते ३० सपासप वार करुन भोसकून खून केला. हा खळबळजनक प्रकार शनिवारी सकाळी ९.३0 वाजण्याच्या सुमारास घडला. परी प्रशांत करकाळे (वय २४) असे या दुर्दैवी सुनेचे नाव असून, तिची सासू रेणुका नामदेव करकाळे (५०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हुंड्यासाठी हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे वालोपे परिसरात खळबळ उडाली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाघझरी येथील करकाळे कुटुंब गेली काही वर्ष वालोपे-देऊळवाडी येथे भाड्याने राहत असून, या कुटुंबात परी ही पती, सासू, सासरे, दीर आणि तिची दोन लहान मुले यांच्यासह राहत होती. सासू-सुनेमध्ये सातत्याने खटके उडत असत. या कटकटीला कंटाळून सासरे नामदेव करकाळे हे शुक्रवारी दुपारी ३ नंतर जानवळे (ता. गुहागर) येथे मेहुण्यांकडे गेले होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे पती प्रशांत आणि त्याचा भाऊ आपापल्या कामावर निघून गेले. त्यावेळी दोन लहान मुले, सासू व सून असे चौघेजण घरी होते. नेहमीप्रमाणे सासू व सुनेमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्या रागातून सासू रेणुकाने परीच्या छातीवर धारदार सुरीने सपासप २५ ते ३० वार केले. हे वार इतके जबरी होते की परी रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच गतप्राण झाली. तिच्या मानेवरही वार करण्यात आले आहेत. छातीवरील दोन वार (पान १० वर)खोलवर गेल्याने तिचा मृत्यू झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी घटनास्थळीच मृतदेहाची तपासणी करून तिला मृत घोषित केले. वालोपेचे पोलिसपाटील बाळकृष्ण भिकू कदम यांनी सकाळी पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून याबाबतची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहा. पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, सहा. पोलिस निरीक्षक बडेसाहब नायकवडी, पोलिस उपनिरीक्षक सचिन शेळके याशिवाय महिला व पुरुष पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.परी करकाळेचे माहेर नांदेड जिल्ह्यातील देगळूर तालुक्यातील करडखेडवाडी येथे असून, पोलिसांनी तिच्या घरी रामराव शिंदे यांच्याकडे संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून पोलिसांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. परीचा पती व दीर यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यानंतर जानवळे येथे गेलेले सासरे नामदेव याला आणण्यासाठी पोलिस गेले. या खुनाचे कारण अस्पष्ट असले तरी हुंडाबळीतून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सुरी व आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले असून, रेणुका करकाळे हिला ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)परीच्या घरचे निघालेपोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर नांदेडहून परीच्या माहेरची मंडळी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी चिपळूणकडे निघाले आहेत. कामथे उपजिल्हा रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले.लहानग्यामुळे झाला खुनाचा उलगडाआपल्या जन्मदात्या आईचा खून होत असताना साडेचार वर्षांचा मुलगा व दीड वर्षाची मुलगी जिवाचा आकांत करीत होते. त्यातील एकाने शेजारी जाऊन आपल्या आईला आजी मारत असल्याचे सांगितले. त्यातून त्या खुनाबाबत माहिती बाहेर आली व तत्काळ शेजाऱ्यांनी पोलिसपाटलांना बोलाविले. त्यामुळे पोलिसांना बोलविणे सहज शक्य झाले. खुनानंतरही सासू, पती व दीर हे तिघे निर्विकारपणे पोलिसांसमोर वावरत होते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काय झाले आहे, हे काहीच न कळलेली दोन लहान मुले आपल्या शेजारच्या घरात शांतपणे बसली होती. रेणुकाने दिली खुनाची कबुलीलहान मुलांची अंघोळ झाल्यानंतर त्यांना कपडे घालण्यावरून या दोघींमध्ये भांडण झाले आणि ते वाढत गेले. आपण परीला मारले असल्याची कबुली रेणुका करकाळे हिने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे.