शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्ट स्किल्स यशस्वी जीवनाचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:48 IST

मानवाला आपल्या जीवनात अनेक संकटांवर मात करून उभे राहावयाचे असेल तर माणूस म्हणून उभे राहण्याचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. माणसाच्या यशामागे ८५ टक्के वाटा हा सॉफ्ट स्किल्सचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने हे सॉफ्ट स्किल्स आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी व लेखिका अंजली धानोरकर यांनी केले.

ठळक मुद्देस्वारातीम विद्यापीठ : उपजिल्हाधिकारी धानोरकर यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मानवाला आपल्या जीवनात अनेक संकटांवर मात करून उभे राहावयाचे असेल तर माणूस म्हणून उभे राहण्याचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. माणसाच्या यशामागे ८५ टक्के वाटा हा सॉफ्ट स्किल्सचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने हे सॉफ्ट स्किल्स आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी व लेखिका अंजली धानोरकर यांनी केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर उपस्थित होते. तसेच प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांची उपस्थिती होती.अध्यक्षीय समारोपात कुलगूरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाची मशागत केली पाहिजे. माणूस घडण्याची प्रकिया समजून घेतली पाहिजे. सध्याच्या काळात ग्लोबल निकष महत्त्वाचे आहे.त्यामुळे हे निकष नीटपणे समजून घेऊन पुढे जायला हवे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स किती महत्त्वाचे आहेत, हे आपणास धानोरकरांच्या व्याख्यानातून लक्षात आले आहे. हे स्किल्स आपण आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सदस्य स्वामी सुरेंद्र यांनी केले. तर आभार गंगाप्रसाद इंगोले यांनी मानले. यावेळी दूरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. राम जाधव, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल, सहायक कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागातील कर्मचारी संभा कांबळे, सुनील कांबळे, बालाजी शिंदे, दत्ता येवले, प्रवीण राठोड या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद