शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

...तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 05:10 IST

नांदेड : अनेकांना अजूनही वाटते काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित कसे आले. आलो आम्ही एकत्रित, कारण ...

नांदेड : अनेकांना अजूनही वाटते काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित कसे आले. आलो आम्ही एकत्रित, कारण हल्लीचा जमाना मल्टीस्टारचा आहे. चित्रपटात तीन-तीन हिरो पाहिजेत त्याप्रमाणेच तीन विचारांच्या तीन पक्षांचे सरकार आले. मात्र, हे सरकार संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करणार आहे. तशी स्पष्ट कल्पना काँग्रेसने शिवसेनेला दिली आहे. एवढेच नव्हे, तर शिवसेनेकडून तसे लिहून घेतले आहे. ज्या दिवशी हे सरकार घटनेच्या चौकटीबाहेर जाईल त्यादिवशी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडेल, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलताना चव्हाण म्हणाले, सरकार स्थापनेच्यावेळी आम्ही दिल्लीत आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, संविधानाच्या चौकटीत राहूनच सरकार चालले पाहिजे.त्याच्या पलीकडे जाता येणार नाही आणि तसे झाले तर सरकारमधून बाहेर पडायचे.सोनिया गांधी यांचे म्हणणे आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यांच्या होकारानंतरच सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे आमचे महाआघाडीचे हे सरकार घटनेप्रमाणेच कामकरेल.कोणताही लेखी करार नाहीशिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रम ठरविला असून त्यावर सर्वांच्या सह्या आहेत. याशिवाय कोणताही लेखी करार झालेला नाही.हा तर हॉरर सिनेमाअशोक चव्हाण यांच्या ‘राज्यातील सरकार हे मल्टीस्टारर सिनेमा’ या वक्तव्यााचा फडणवीस यांनी समाचार घेतला़ हा मल्टीस्टार सिनेमा नसून हॉरर सिनेमा आहे़तो किती दिवस पहायचा हेजनताच ठरवील़ परंतु हा हॉरर सिनेमा लवकरच बंद होणार, असेही ते म्हणाले़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी