तर लहान मुलांच्या आरोग्यासाठी पाचशे खाटांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST2021-05-08T04:18:21+5:302021-05-08T04:18:21+5:30

नांदेड जिल्ह्याची एकुण लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ३३ लाख ६१ हजार एवढी आहे. यात शुन्य ते ६ वयोगटातील ...

So the planning of five hundred beds for the health of children | तर लहान मुलांच्या आरोग्यासाठी पाचशे खाटांचे नियोजन

तर लहान मुलांच्या आरोग्यासाठी पाचशे खाटांचे नियोजन

नांदेड जिल्ह्याची एकुण लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ३३ लाख ६१ हजार एवढी आहे. यात शुन्य ते ६ वयोगटातील लोकसंख्या ही जिल्ह्याच्या एकुण लोकसंख्येच्या १३.६७ टक्के एवढी आहे. शुन्य ते १७ या वयोगटातील संख्या विचारात घेता हे प्रमाण २० टक्क्यांच्या जवळपास येते. या वयोगटातील मुलांच्या आरोग्यासाठी विशेष काळजी व तसे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यादृष्टिने या बैठकीत डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, गुरुगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मुलांसाठी उपचारांच्या सेवा-सुविधा बाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासाठी स्वतंत्र बालरोग तज्ज्ञांचा स्वतंत्र टास्क फोर्स निर्माण करुन व्हेंटिलेटर व इतर उपकरणांच्या सुसज्जतेसाठी कृति आराखडा तयार केला आहे. पुढील एक महिन्यांमध्ये याचे नियोजन करण्याचे प्रस्तावित आहे.

Web Title: So the planning of five hundred beds for the health of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.