शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

मन्याडच्या मातीला संघर्षाचा गंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:35 IST

मन्याड खोºयातील मातीला राजकीय संघर्षाचा गंध आहे. कंधार तालुक्यातील दोघांना स्वातंत्र्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश आले. १९७७ मध्ये केशवराव धोंडगे व २०१९ ला प्रताप पा.चिखलीकर यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली.

ठळक मुद्देमन्याड खोऱ्याने दिले दोन खासदारकेशवराव धोंडगेंनंतर प्रताप चिखलीकर

गंगाधर तोगरे।कंधार : मन्याड खोºयातील मातीला राजकीय संघर्षाचा गंध आहे. कंधार तालुक्यातील दोघांना स्वातंत्र्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश आले. १९७७ मध्ये केशवराव धोंडगे व २०१९ ला प्रताप पा.चिखलीकर यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, दोघांनीही कॉग्रेसच्या मातब्बर पुढाऱ्यांना पराभूत करण्याची किमया साधली.कंधार तालुक्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक संवर्धनाचा समृद्ध वारसा आहे. तसेच राजकीय संघर्षाने मन्याड खोरे सतत चर्चेत राहत आले आहे. भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी शेकापच्या माध्यमातून कॉग्रेस पक्षाविरोधात सतत संघर्ष केला. मन्याड खोºयात शेकापची मजबूत पकड निर्माण केली. त्यांना भाई गुरूनाथराव कुरुडे यांची साथ लाभली. त्यामुळे केशवरावांनी तीन दशके विधानसभेत या भागाचे प्रतिनिधित्व केले. तत्कालीन मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांच्यासोबत ते राजकीय संघर्ष करत राहिले. १९७७ ला केशवराव धोंडगे यांना नांदेड लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली.तुटपुंजी राजकीय रसद, प्रचाराची अपुरी साधने, वाहनांची वाणवा राहिली. परंतु कार्यकर्ते मात्र स्वखर्चाने पायाला भिंगरी बांधल्यासमान केशवरावांना विजयी करण्यासाठी फिरले. आणि केशवराव कॉग्रेस उमेदवाराविरोधात प्रचंड मतांनी विजयी झाले. हा कंधार तालुक्याला पहिला खासदार व लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान धोंडगे यांच्यामुळे मिळाला. चार दशकानंतर प्रताप पा. चिखलीकर यांच्या रुपाने २०१९ ला दुसºयांदा तालुक्याच्या भूमिपुत्राला संधी मिळाली.प्रताप पा. चिखलीकर यांची राजकीय जडणघडण कॉग्रेस पक्षात सुरूवातीच्या काळात झाली. गावचे सरपंच ते बारूळ, पेठवडज, कलंबर जि.प. सर्कलमधून विजयी होत राजकीय सत्तेत दमदार प्रवेश करत आपली धाडसी नेता अशी ओळख निर्माण केली. कॉग्रेसला बळकट करत असताना विधानसभेची उमेदवारी मागितली. परंतु उमेदवारी नाकारली तरी पक्षाचा आदेश मानत पक्ष उमेदवाराचा प्रचार केला. पुन्हा २००४ साली पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आणि विजयी होऊन राजकीय क्षमता सिद्ध केली.प्रताप पा.चिखलीकर हे एक अजब राजकीय रसायन आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहत काम करत राहिले. तरीही पक्षाने अन्याय केला तर काहीकाळ सहन करायचा.परंतु सतत अन्याय होत राहिला तर समर्थक, कार्यकर्ते यांच्याशी विचारविमर्श करत राजकीय निर्णय घ्यायचा. अशी अफलातून खुबी त्यांची राहत आली. शिवसेनेविरोधात राजकीय मतभेद झाले आणि भाजपाशी राजकीय सलगी वाढवत पक्ष मजबूत करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्री केली आणि धाडशी निर्णय घेत एकेकाळी असलेल्या मित्राविरोधात लोकसभा निवडणूक रिंगणात उडी घेतली. जिल्ह्यात राजकीय जाळे भक्कम असलेल्या व मॅनेजमेंट गुरू असलेल्या अशोकराव चव्हाण यांचा राजकीय चक्रव्यूह भेदण्याची किमया साधली. राजकीय संघर्ष मन्याड खोºयातला सतत चर्चेत असतो. त्यावर मात करत यशस्वी होणे ही या भागातील नेत्यांची विशेषत: आहे. तालुक्याने लोकसभेत मोठ्या संघर्षाने दोनदा संधी मिळवली. म्हणून मन्याड खोºयाला राजकीय संघर्षाचा गंध आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.विलासरावांच्या जवळीकतेमुळे तिकीट कापलेनिवडून आल्यानंतर कॉग्रेस-रा.कॉ. आघाडी सरकारला पाठिंबा दिला. कंधार-लोहा तालुक्याचा विकास करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांच्याशी जवळीक साधली. परंतु याची मोठी राजकीय किंमत त्यांना पुन्हा २००९ साली कॉग्रेसने उमेदवारी नाकारल्याने चुकवावी लागली.तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी चिखलीकर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी कोणतीच कसर ठेवली नाही. चिखलीकर पराभूत झाले तरीही ते नव्या उमेदीने कार्यकर्त्याशी, जनतेशी कधी नाळ तुटू दिली नाही.२०१४ साली विधानसभा निवडणुकीत हाती धनुष्यबाण घेत झंझावात निर्माण केला. मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली तरीही चिखलीकरांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा