शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मद्यासाठी आॅईलच्या टँकरमधून मळीची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:10 AM

इंडियन आॅईल कंपनीच्या टँकरमधून मळीची वाहतूक होत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेड विभागाने उघडकीस आणला़ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड ते अहमदपूर रोडवरील इसाद येथे हा ट्रक ताब्यात घेण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे़ दारु तयार करण्यासाठी या मळीचा वापर करण्यात येतो़

ठळक मुद्देराज्य उत्पादनची कारवाई : त्रिधारा शुगरचा उपद्व्याप

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : इंडियन आॅईल कंपनीच्या टँकरमधून मळीची वाहतूक होत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेड विभागाने उघडकीस आणला़ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड ते अहमदपूर रोडवरील इसाद येथे हा ट्रक ताब्यात घेण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे़ दारु तयार करण्यासाठी या मळीचा वापर करण्यात येतो़परभणी जिल्ह्यातील आमडापूर येथील त्रिधारा साखर कारखान्यामधून अवैधरीत्या हातभट्टी निर्मितीसाठी मळीची वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती राज्य नीलेश सांगडे यांना मिळाली होती़त्यानंतर निरीक्षक एस़एस ख़ंडेराय, पी़ए़ मुळे, डी़एऩ चिलवंतकर, आनंद कांबळे, एस़एम़ बोदमवाड, रफत कोतवाल, दुय्यम निरीक्षक ठाकूर, चाळनेवाड, घुगे, मानेरे, अनकाडे, नंदगावे, राठोड, स्वामी, शेख, पवार यांच्या पथकाने गंगाखेड-अहमदपूर रस्त्यावर इसाद शिवारात इंडियन आॅईल कंपनीच्या (एम़एच़०४- डीडी १४७४) या टँकरला अडविले़यावेळी पथकाने टँकरची तपासणी केली असता, त्यात २० ते २२ मेट्रीक टन मळी असल्याचे आढळून आले़उत्पादन शुल्कच्या पथकाने टँकरचालक दत्तात्रय लक्ष्मण मुळे व लक्ष्मण विलास खटके या दोघांना विचारपूस केली़त्यावेळी इंडियन आॅईल कंपनीचे बनावट बोधचिन्ह लावून अवैधरीत्या मळीची वाहतूक करण्यात येत असल्याची कबुली त्यांनी दिली़ तसेच सदरील टँकर हा त्रिधारा शुगर लि़ (आमडापूर जि़परभणी) येथून भरला असून तो सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा येथे हातभट्टी निर्मिती केंद्रावर जात असल्याचे त्यांनी सांगितले़त्यानंतर अधीक्षक निलेश सांगडे यांनी त्रिधारा शुगरची तपासणी केली़ यावेळी नोंदवहीत काहीच आढळून आले नाही़ तसेच गाळपामध्येही विसंगती असल्याचे दिसून आले़ त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती़नोंदवहीत विसंगती आढळल्याने गुन्हा दाखलअधीक्षक निलेश सांगडे यांनी त्रिधारा शुगरची तपासणी केली़ यावेळी नोंदवहीत काहीच आढळून आले नाही़ तसेच गाळपामध्येही विसंगती असल्याचे दिसून आले़ त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती़

टॅग्स :NandedनांदेडSugar factoryसाखर कारखाने