शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याला ६ जणांनी लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:08 IST

बोधडी ते हिमायतनगर रस्त्यावर रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चालकाशी वाद घालत चारचाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या़ त्यानंतर वाहनातील सव्वालाख रुपये रोख आणि मोबाईल लंपास करण्यात आला़ याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला आहे़

ठळक मुद्देबोधडी- हिमायतनगर रस्त्यावरील घटना रोख सव्वालाख रुपये केले लंपास

नांदेड : बोधडी ते हिमायतनगर रस्त्यावर रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चालकाशी वाद घालत चारचाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या़ त्यानंतर वाहनातील सव्वालाख रुपये रोख आणि मोबाईल लंपास करण्यात आला़ याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला आहे़यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकीचे अनिल अशोक गडपेवार हे आपल्या एका साथीदारासह किराणा मालाची वसुली करण्यासाठी किनवट तालुक्यात गेले होते़ यावेळी सोबत त्यांनी वाहनात काही किराणा मालही घेतला होता़ वसुलीचे पैसे घेवून ते आयचरने ढाणकीकडे परत निघाले होते़यावेळी रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या टोळीने गडपेवार यांचे वाहन दिसताच त्यावर दगडफेक केली़ या दगडफेकीत वाहनाची काच फुटली़ यावेळी गडपेवार हे गाडी थांबवून खाली उतरले़ दगडफेक करणाऱ्यांना जाब विचारत असताना, दबा धरुन बसलेले इतर पाच जण त्या ठिकाणी आले़ त्यांनी गडपेवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़यावेळी गाडीतील रोख सव्वा लाख रुपये आणि मोबाईल लंपास करण्यात आला़ यावेळी चार चोरट्यांनी पांढºया रंगाच्या कारमधून तर दोघांनी विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन पळ काढला़ अनिल गडपेवार यांच्या तक्रारीवरुन किनवट पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास सपोनि व्ही़ डी़ कांबळे हे करीत आहेत़शेतीच्या कारणावरुन कु-हाडीने मारहाणलोहा तालुक्यातील आसूर शिवारात १५ जून रोजी शेतीच्या कारणावरुन एकाच्या डोक्यात कु-हाडीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ज्योती कैलास पुरी यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे़ कैलास पुरी हे १५ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आसूर शिवारातील शेतात होते़ त्यावेळी या ठिकाणी काही जण आले़ यावेळी त्यांनी कैलास पुरी यांच्याशी वाद घालत त्यांच्या डोक्यात कुºहाडीने मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला़ तसेच त्यांच्या खिशातील रोख १९ हजार रुपये व ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले़ याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीNanded policeनांदेड पोलीस