अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात एसआयटीची स्थापन, नांदेड येथे मदरशात घडली होती घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 04:30 IST2018-01-16T17:45:40+5:302018-01-17T04:30:37+5:30
शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या इस्लामिया अरबिया नुरुलील येथे शिक्षण घेणार्या एका अल्पवयीन मुलीवर मौलानानेच बलात्कार केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणात तपासासाठी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे़

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात एसआयटीची स्थापन, नांदेड येथे मदरशात घडली होती घटना
नांदेड : शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या इस्लामिया अरबिया नुरुलील येथे शिक्षण घेणार्या एका अल्पवयीन मुलीवर मौलानानेच बलात्कार केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणात तपासासाठी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे़
चुनाभट्टी येथील मदरशात माजलगाव येथील दोन सख्या बहिणी शिक्षण घेत होत्या़ गेल्या सहा महिन्यांपासून मदरशातील मौलाना साबेर फारुखी याने स्वतःच्या मोबाईलमध्ये असलेली अश्लील चित्रफित दाखवत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करत होता. या प्रकरणात पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर सोमवारी रात्री आणखी दोन मुलींनी विनयभंगाच्या तक्रारी दिल्या. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मौलाना साबेर फारुखी फरार झाला आहे.
मौलानाच्या विरोधात वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन सखोल तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीच्या प्रमुख सुनिता बोरगांवकर म्हणाल्या, मौलानाच्या विरोधात आणखी काही तक्रारी येण्याची शक्यता आहे़ मदरशाची पाहणी करण्यात आली असून सर्व रेकॉर्ड ताब्यात घेण्यात आले आहे़ तसेच मौलानाच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आली आहे.दरम्यान, आज पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी मदरशाची पाहणी केली़