लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : ४० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालय व कर्मचा-यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाल्याने अधिकारी- कर्मचा-यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे़ अधिका-यांसह कर्मचा-यांना भाड्याच्या घरात रहावे लागत आहे़ वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे व वन क्षेत्राला बाधा पोहोचू नये, यासाठी माहूर येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सुरू करण्यात आले़ तालुक्यात एकूण वनक्षेत्र १३ हजार ६१७़९८१ हेक्टर असून राखीव वनक्षेत्र ९ हजार ९८५़१३३ हेक्टर आहे़जंगल शिवाराचे संरक्षण करण्यासाठी ५ वनपरिमंडळ कार्यालये असून २१ ठिकाणी बीटची स्थापना करण्यात आली आहे़सध्या वनाचे संरक्षण करण्यासाठी १ वनपरिक्षेत्र अधिकारी, ६ वनपाल, २० वनरक्षक व १७ वनमजूर नियुक्त आहेत़ मात्र वन कर्मचाºयांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाल्याने वन कर्मचारी सध्या भाड्याच्या घरात राहून कर्तव्य बजावत असतात़ रात्री बेरात्री त्यांना जंगलात जावे लागते़ वन विभागातील वरिष्ठांशी वेळोवेळी संपर्क साधून अद्ययावत माहिती द्यावी लागते़माहूर तालुक्यात अधिकारी-कर्मचारी व वनमजूर कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याची व्यवस्था झाल्यास वन विभागाच्या कार्याला पुन्हा गती येवू शकते़कर्मचाºयांना चांगल्या निवासस्थानाची गरजकर्मचाºयांच्या निवासस्थानाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे़ वन विभागातील वरिष्ठांनी नियोजनबद्ध आखणी करून निवासस्थाने बांधण्यासाठी पुढाकार घेतल्यास शासन व प्रशासनाला लाभ होण्याची शक्यता अधिक होईल असे वन्यप्रेमी नागरिकांचे म्हणणे आहे़ माहूर तालुक्यातील गोंडवडसा व मेंडकी वनपरिमंडळला निवासस्थाने नसल्याने येथील कर्मचाºयांना कर्तव्य बजावत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ तर तालुक्यातील तांदळा, बोरवाडी, मेंडकी, मुंगशी, रामपूर, गोंडवडसा, अजनी, वझरा (शेफ़़) येथे वनरक्षकांची निवासस्थाने नाहीत़तालुक्यात अनेक बीटस्तरावर वनरक्षकाची निवासस्थाने नसल्याने वनरक्षक हे मुख्यालयी राहत नाहीत़ त्यामुळे अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे़ त्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने कर्मचा-यांसाठी नवीन निवासस्थानांची निर्मिती करावी, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे़पाचुंदा, मांडवा, माहूर वन परिमंडळात वन कर्मचा-यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली़ मात्र बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पावसाळ्यात इमारतींना गळती लागत आहे़ विद्युत व्यवस्था नसल्याने कर्मचाºयांना अंधारातच रात्र काढावी लागते़ तर या ठिकाणी पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याने मागील चर महिन्यांपासून वन कर्मचा-याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़तालुक्यातील माहूर, पाचुंदा येथील वन कर्मचा-यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी निवासस्थाने कर्मचाºयांना अडचणी निर्माण होत आहे़ कर्मचा-यांची अडचण लक्षात घेवून निवासस्थान उभारल्यास प्रशासनामध्ये गतीमानता येईल व गस्त घालण्यास उपयुक्त ठरेल.-श्रीधर कवळे,वनपरिक्षेत्र अधिकारी, माहूऱ
श्रीक्षेत्र माहूर वन कर्मचाऱ्यांची निवासस्थाने मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:07 IST
४० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालय व कर्मचा-यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाल्याने अधिकारी- कर्मचा-यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे़ अधिका-यांसह कर्मचा-यांना भाड्याच्या घरात रहावे लागत आहे़ वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे व वन क्षेत्राला बाधा पोहोचू नये, यासाठी माहूर येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सुरू करण्यात आले़ तालुक्यात एकूण वनक्षेत्र १३ हजार ६१७़९८१ हेक्टर असून राखीव वनक्षेत्र ९ हजार ९८५़१३३ हेक्टर आहे़
श्रीक्षेत्र माहूर वन कर्मचाऱ्यांची निवासस्थाने मोडकळीस
ठळक मुद्दे४० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती निवासस्थाने: अधिकारी, कर्मचारी भाड्याच्या इमारतीत ! वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी