‘स्वारातीम’ विद्यापीठातील श्री गुरुगोविंदसिंघजी संकुल जागतिक दर्जाचे होणार -कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:17 IST2021-01-22T04:17:15+5:302021-01-22T04:17:15+5:30
श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील श्री गुरुगोविंदसिंघजी अध्यासन व अभ्यास संकुल, माध्यमशास्त्र संकुल येथे ...

‘स्वारातीम’ विद्यापीठातील श्री गुरुगोविंदसिंघजी संकुल जागतिक दर्जाचे होणार -कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील श्री गुरुगोविंदसिंघजी अध्यासन व अभ्यास संकुल, माध्यमशास्त्र संकुल येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सरदार लड्डूसिंग महाजन श्री गुरुगोविंदसिंघजी अध्यासन व अभ्यास केंद्राचे संचालक, सरदार विरेंद्रसिंग गाडीवाले स्थायी समिती सभापती नांदेड वाघाळा महानगरपालिका, सरदार गुरुबचनसिंग शिलेदार, परविंदर कौर कोल्हापुरे, निरंजन कौर, सरदार रणवीरसिंग रामगडीया, सरदार इंद्रजितसिंग कलाह, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, हुशारसिंग साबळे, डॉ. राजेंद्र गोनारकर, डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले, डॉ. कैलाश यादव, डॉ. राहुल पुंडगे यांची उपस्थिती होती.
श्री गुरुगोविंदसिंघजी यांचे कार्य हे जगाला आदर्श देणारे आहे. नांदेड शहर हे आज जगभरात त्यांच्या नावानेच ओळखले जाते. नांदेडसारख्या पवित्र भूमीतील या विद्यापीठाला श्री गुरुगोविंदसिंघजी अध्यासन व अभ्यास संकुल जागतिक दर्जाचे होणे हे विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे.
प्रास्ताविक माध्यमशास्त्र संकुलाचे तथा श्री. गुरुगोविंदसिंगजी अध्यासन व अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. दीपक शिंदे यांनी केले तर आभार डॉ. राजेंद्र गोनारकर यांनी मानले.