थोडक्यात महत्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST2021-04-20T04:18:42+5:302021-04-20T04:18:42+5:30
नांदेड : कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे लघुउद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

थोडक्यात महत्वाचे
नांदेड : कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे लघुउद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामध्ये हॉटेल, पानटपरी, चहाचे गाडे, खानावळ आदींचा समावेश आहे. मागील वर्षभरापासून लघुउद्योजक आर्थिक अडचणीतून जात आहेत.
उन्हाळी मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त
नांदेड : गत पंधरा, वीस दिवसांपासून तालुक्यातील पासदगाव, लिंबगाव, महिपाल पिंपरी, निळा, आदी गाव परिसरात शेतकरी शेतीमशागतीत व्यस्त आहेत. उन्हाचा पारा वाढत असल्याने सकाळी दहा ते दुपारी २ यावेळेतच मशागतीचे कामे उरकून घेतली जात आहेत. नांगरणी, पाळी घालणे, काशा वेचणे आदी कामे करताना शेतकरी दिसत आहेत.
वाडी तांड्यावर पाणीटंचाई
नांदेड- जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, किनवट, उमरी या तालुक्यातील वाडी तांड्यावर पाणीटंचाई निर्माण झाली असून येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातान्हांत पायपीट करत आहेत. प्रशासनाने या भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
सायकलिंगचे प्रमाण वाढले
नांदेड : शहरात मागील काही महिन्यांपासून सायकलिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दररोज सकाळी मालेगाव रोड, पूर्णा रोडवर सायकलिंग करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या कोरोनामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे. व्यायाम, प्राणायम, योगासन, चालणे आदींकडे लक्ष देत आहेत.