शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! तणावातून पित्याची मुला-मुलीसह सामुहिक आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 13:57 IST

मृतदेहाशेजारीच आढळून आला विषारी द्रव्याचा डबा

ठळक मुद्देकिनवटच्या जंगलात आढळून आले मृतदेह  किनवट-माहूर रस्त्यावरील धक्कादायक प्रकार

नांदेड : किनवट-माहूर रस्त्यावरील वडूलीफाटा येथील एस. टी. निवाऱ्यामागील जंगल भागात पित्यासह दहा वर्षीय मुलगा आणि बारा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाशेजारीच विषारी द्रव्याचा डबा सापडल्याने हा सामूदायिक आत्महत्येचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असला तरी मुलाची जीभ बाहेर आलेली असल्याने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करुन त्यानंतर विष पाजले असावे, असा संशयही व्यक्त होत आहे. 

किनवट-माहूर रस्त्यावर वडूलीफाटा आहे. या फाट्यावर एस. टी. थांब्याचा निवाराशेड आहे. या शेडमागील वन भागात संतोष चव्हाण या इसमाचा मृतदेह आढळून आला. त्याच्यापासून काही अंतरावर त्याच्याच दहा वर्षीय मुलाचा आणि बारा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. 

घटनेची माहिती तेथील काहींना समजल्यानंतर त्यांनी तातडीने किनवटसह माहूर पोलीस ठाण्याला दूरध्वनीद्वारे ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपविभागीय अधिकारी ए. डी. जहारवाल हेही घटनास्थळाकडे रवाना झाले. 

पत्नी सोडून गेल्याने होता तणावात प्राप्त माहितीनुसार संतोष चव्हाण हा मूळचा विदर्भातील साखरा या गावचा रहिवासी असून १५ वर्षांपूर्वी तो या भागातील रामूनाईकतांडा येथे मजुरीसाठी आला होता. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी याच भागात तो राहू लागला. महिनाभरापूर्वी त्याची पत्नी संतोष यास सोडून गेली होती. या तणावातूनच संतोष चव्हाण याने स्वत:सह मुलांना विष पाजून मारले असावे असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर राजगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. काळे शवविच्छेदनासाठी घटनास्थळाकडे रवाना झाले असून तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याNandedनांदेडforestजंगलFamilyपरिवार