शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

प्राण्यांसाठीच्या कुंपणाचा शॉक लागून पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:04 IST

शेतकऱ्याने शेताभोवती विद्युत वाहक तारेचे कुंपण केले होते.

बिलोली (जि. नांदेड) : जंगली प्राण्याच्या उपद्रवापासून मुगाचे संरक्षण करण्यासाठी शेताभोवती टाकलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना बिलोली तालुक्यातील बामणी शिवारात ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. रजनीकांत रामराव गेटकेवार (४०) व विजय रजनीकांत गेटकेवार (१६) अशी मृतांची नावे आहेत. 

बामणी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवारात हरीण, रानडुक्कर, वानर आदी प्राण्यांचा हैदोस वाढल्याने त्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी संजय लक्ष्मण गेटकेवार या शेतकऱ्याने शेताभोवती विद्युत वाहक तारेचे कुंपण केले होते. या कुंपणाचा शॉक लागून उपरोक्त दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बिलोलीचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, बीट जमादार संतोष शिंदे, शेख इरफान यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान गेटकेवार कुटुंबियांवर कोसळलेल्या या प्रसंगामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूagricultureशेतीFarmerशेतकरी