सिडको-हडको परिसरात शिवजन्मोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST2021-02-23T04:26:47+5:302021-02-23T04:26:47+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आ. मोहनराव हंबर्डे व सामाजिक कार्यकर्त्या आशा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र ...

सिडको-हडको परिसरात शिवजन्मोत्सव उत्साहात
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आ. मोहनराव हंबर्डे व सामाजिक कार्यकर्त्या आशा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संकेत पाटील, दिगंबर शिंदे, त्र्यंबक कदम, भगवान ताटे, बापूसाहेब पाटील, सोपानराव पांडे, सोपानराव पाटील, गजानन पवार, साहेबराव गाडे, अशोक कदम, प्रा. अशोक मोरे, रोहिदास कवाळे, गोविंद मजरे, विठ्ठल गायकवाड, संजय पाटील घोगरे, शिवाजी हंबर्डे, गजानन शिंदे, रावण हांबिरे, प्रमोद टेहरे, डी.के. शिंदे, जयवंतराव काळे, बालाजी हिवराळे, रोहित कांबळे, प्रा. मधुकर गायकवाड, नगरसेवक श्रीनिवास जाधव, उदय देशमुख, डॉ. नरेश रायेवार, डॉ. देवानंद जाजू, प्रा. संजय चाटे, के.एल. ढाकणीकर, गजानन कत्ते, सतीश बसवदे, गंगाधर नंदेवाड, अन्नाराव गिरडे, सुभाष सूर्यवंशी, ना.ही. उमाटे, सरस्वती धोपटे, प्रसेनजित वाघमारे, संभाजी सोनकांबळे आदींनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला १८ फेब्रुवारी रोजी रात्री हडको परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा ज्योती पाटील, कमल हिवराळे, रुक्मिणी सूर्यवंशी, संगीता मोरे, प्रेमला सूर्यवंशी, अनुषा पाटील, संगीता कदम, सोनाली डफडे, सुनीता कदम, सुमन जाधव व गंगाबाई कानोले यांची उपस्थिती होती. याशिवाय, सामाजिक कार्यकर्ते राजू लांडगे यांच्या वतीने गुरुवारी मध्यरात्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी राजू लांडगे, शाहीर गौतम पवार, दिगंबर शिंदे, संकेत पाटील, मयूर अमिलकंठवार, संजय घोगरे, अजिंक्य लोंढे व गोविंद कदम आदींची उपस्थिती होती. दरम्यान, डीवायएसपी. डॉ. सिद्धेश्वर भोरे व पो.नि. अशोक घोरबांड यांनी विनम्र अभिवादन केले.