शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'माझी वसुंधरा' अभियानात शिराढोण ग्रामपंचायत मराठवाड्यात अव्वल, ५० लाखांचे पारितोषिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 19:41 IST

या अभियानांतर्गत गेली वर्षभर ग्रामपंचायतीने गावात विविध उपक्रम राबविले होते.

- मारोती चिलपिपरेकंधार : शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित राबविण्यात येत असलेल्या 'माझी वसुंधरा' अभियानामध्ये ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावात छत्रपती संभाजीनगर विभागातून कंधार तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायत पहिली आली आहे. ५० लाखाच्या बक्षीसास पात्र झाली आहे. 

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसगांशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाले. माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ४ मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्वानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावात छत्रपती संभाजीनगर विभागातून कंधार तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायत पहिली आली आहे. ५० लाखाच्या बक्षीसास पात्र झाली आहे.

ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ४ मध्ये भाग घेतला होता. या अभियानांतर्गत गेली वर्षभर ग्रामपंचायतीने गावात विविध उपक्रम राबविले होते. त्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक निर्मुलन, कचरा संकलन, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन, वनराई बंधारे बांधणे, प्रदूषण मुक्त गाव, सोलार योजना आदी उपक्रम राबविले होते. शुक्रवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावात गावाचा छत्रपती संभाजी विभागातून शिराढोण ग्राम पंचायतचा पहिला क्रमांक आला. ५० लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. स्पर्धेचा निकाल समजताच सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ तसेच यासाठी परीश्रम घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. या निवडीबद्दल अनेक स्तरातून अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे. 

सर्वांच्या परिश्रमाने यश मिळालेगेली वर्षभर गावातील सर्व कमिट्या, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद, खाजगी शाळा या सर्वांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यश मिळाले आहे. ग्रामस्थांनीही चांगले सहकार्य केल्यामुळे छत्रपती संभाजी नगर विभागातून पहिला येण्याचा मान मिळाला. - खुशाल माधवराव पांडागळे, सरपंच शिराढोण

टॅग्स :Nandedनांदेडgram panchayatग्राम पंचायतMarathwadaमराठवाडा