शाहू महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:28+5:302021-06-27T04:13:28+5:30

सामाजिक न्याय दिवस नांदेड, एकात्मिक व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून ...

Shahu Maharaj Jayanti | शाहू महाराज जयंती

शाहू महाराज जयंती

सामाजिक न्याय दिवस

नांदेड, एकात्मिक व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रकल्प अधिकारी राठोड यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी केंद्रातील इतर कर्मचारीही उपस्थित होते.

मुस्लिम लिग पक्षाचे शासनास निवेदन

नांदेड, विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी व मित्र पक्षांनी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी तसेच अल्पसंख्यांकांना ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी इंडियन युनियन मुस्लिम लिग पक्षाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.

शाहू महाराज जयंती

नांदेड, रामानंदनगर येथील नवनिकेतन प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

योग दिन साजरा

नांदेड, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नवनिकेतन प्राथमिक शाळेच्या प्रांगणात योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध प्रकारचे आसने करून योग शिक्षकांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Shahu Maharaj Jayanti