शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

आचारसंहिता भंगाचे सात गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:20 IST

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सी-व्हिजील अ‍ॅपद्वारे दोन गुन्हे दाखल झाले

ठळक मुद्देराजकीय छायाचित्र, मजकूर न हटविल्याने झाली कारवाई

नांदेड: जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सी-व्हिजील अ‍ॅपद्वारे दोन गुन्हे दाखल झाले असून या अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन राज्यात पहिल्यांदाच नांदेड जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झाली आहे. ४८ तासांत शासकीय कार्यालय, निमशासकीय, राजकीय पक्षांना प्रचाराशी संबंधित छायाचित्र हटविण्याची मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही राजकीय पक्षाशी संबंधित छायाचित्र, मजकूर असल्याने निवडणूक विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. पहिला गुन्हा नायगाव तालुक्यात रामतीर्थ पोलीस ठाण्यात दाखल झाला. नायगाव, नरसी रस्त्यावर एनआरगुडगिला इंडियन आॅईल पेट्रोलपंपावर राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीची जाहिरात लावण्यात आली होती. या प्रकरणी आचारसंहिता प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला. दुसरा गुन्हा नांदेडमधील वजिराबाद ठाण्यात दाखल झाला. नांदेड मध्यवर्ती बसस्थानकात राजकीय पक्षाशी संबंधित बॅनर आढळल्याने आगार व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. महापालिका इमारतीत राजकीय पक्षाचा प्रचार केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बॅनर लावल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला तर शहरातीलच इतवारा ठाण्यात बाबा भारत गॅस एजन्सी येथे उद्घाटनाच्या बॅनरवर राजकीय पदाधिकाऱ्यांचे फोटो असल्याने आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ मार्चपर्यंत एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सी-व्हिजील अ‍ॅपच्या तक्रारीचा राज्यात पहिला गुन्हासी-व्हीजील या अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन राज्यातील पहिला गुन्हा हदगाव ठाण्यात दाखल झाला. हदगावच्या माजी नगराध्यक्षांच्या मोटारसायकलवर राजकीय पक्षाच्या ध्वजाचे स्टिकर असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.दुसरी तक्रार एसबीआय बँकेच्या धनेगाव शाखेच्या व्यवस्थापकाविरुद्ध दाखल करण्यात आला. नवीन नांदेडातील यशोधरानगरमध्ये असलेल्या एटीएमवर प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जाहिरात सुरु असल्याची तक्रार सी-व्हीजीलच्या माध्यमातून केली होती. या तक्रारीची शहानिशा केली असता ती खरी आढळली. त्यामुळे नांदेड ग्रामीण पोलिसांनी आचारसंहितेचा गुन्हा दाखल केला. सी-व्हिजीलच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या पाच तक्रारीपैकी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यात तीन तक्रारी हदगाव विधानसभा मतदारसंघात आणि नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण मतदारसंघात प्रत्येकी एक तक्रार प्राप्त झाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग