टायर विक्रीसह सर्व्हीस सेंटर राहणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:18 IST2021-04-09T04:18:15+5:302021-04-09T04:18:15+5:30
दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात आली असल्यामुळे या क्षेत्राशी निगडीत टायर ...

टायर विक्रीसह सर्व्हीस सेंटर राहणार सुरू
दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात आली असल्यामुळे या क्षेत्राशी निगडीत टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप सर्व्हीस सेंटर आणि स्पेअर पार्ट विक्री या आस्थापनांना सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, वॉशिंग सेंटर, डेकोर आणि इतर तत्सम शॉप केंद्र बंद राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याबरोबरच सध्या पावसाळापूर्व आणि पूर्व हंगामी शेती क्षेत्रातील कामे सुरू ठेवणे आवश्यक असल्यामुळे शेती निविष्टा आणि अवजारे यांच्या आस्थापनाही सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी ८ मार्च रोजी याबाबतचे आदेश जारी केले.