नांदेडच्या काबरानगरमधून दोन विद्यार्थी गायब झाल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 14:59 IST2018-02-11T14:56:00+5:302018-02-11T14:59:17+5:30
शाळा सुटल्यानंतर खाजगी शिकवणीला गेलेले दोन शाळकरी विद्यार्थी गायब असल्याने काबरा नगर परिसरात खळबळ उडाली आहे.

नांदेडच्या काबरानगरमधून दोन विद्यार्थी गायब झाल्याने खळबळ
नांदेड : शाळा सुटल्यानंतर खाजगी शिकवणीला गेलेले दोन शाळकरी विद्यार्थी गायब असल्याने काबरा नगर परिसरात खळबळ उडाली आहे़
काबरानगर परिसरातील श्रीकांत मनोज हंगरगे (वय १२) हा पासदगाव परिसरातील होलिसीटी पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता ५ वीमध्ये शिकत आहे़ तर शरद रवींद्र भोसीकर (वय १४) हा पावडेवाडी नाक्यावरील राणी लक्ष्मीबाई प्रशालेमध्ये इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत आहे़ दोघेही एकमेकांचे नातेसंबंधातील असून शाळा सुटल्यानंतर ते एकत्रित पावडेवाडी नाका परिसरातील एका खाजगी क्लासेसमध्ये शिकवणीसाठी गेले होते़ मात्र त्यानंतर ते दोघेही घरी परतले नाहीत़ दोघांच्याही कुटुंबियांनी शनिवारी दुपारनंतर या मुलांचा नातेवाईकांसह इतर ओळखींच्या मंडळीकडे शोध घेतला़ मात्र त्यांचा पत्ता लागला नाही़ अखेर हे दोघे बेपत्ता असल्याबाबत रविवारी दुपारी भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
एकाच दिवशी दोन शाळकरी विद्यार्थी बेपत्ता झाल्याने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे़ दरम्यान, या मुलांचा शोध लागल्यास अथवा कुठे आढळून आल्यास ८८८८२३८३५५ या क्रमांकावर अथवा भाग्यनगर पोलिस ठाणे नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.