शिवा कांबळे हे गेली तीस वर्षं सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत. शिवा कांबळे हे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक असून ‘प्रतिभेचा हिमालय : अण्णा भाऊ साठे’ या चरित्र ग्रंथाचे लेखकही आहेत. २०१७ साली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे (कादंबरी) चे दोन खंड प्रकाशित झाले असून ते दोन खंड प्रकाशित करण्यात शिवा कांबळे यांचे मोठे योगदान राहिले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ बालभारतीच्या मराठी समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे
शिवा कांबळे यांची अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST