शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सातबाऱ्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा लढा; जिद्दी शेतकऱ्यास यंदा सरकारी यंत्रणेची सकारात्मक साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:57 IST

जिद्दी शेतकऱ्याची कहाणी; तब्बल ४५ वर्षानंतर मिळाला हक्काचा सातबारा

मुदखेड (नांदेड) : सरकारी काम कार्यालयात अनेक खेटे मारल्याशिवाय होत नाही असा अनेकांना अनुभव आला असेल. असाच अनुभव मुदखेड तालुक्यातील मौजे डोणगाव येथील शेतकऱ्यांना आला आहे. शेतकरी कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार या शेतकऱ्यांना शेत जमिनीचा ७/१२ एक-दोन वर्ष नाही तर तब्बल ४५ वर्षांनंतर मिळाला आहे.

तालुक्यातील मौजे डोणगाव येथील शेतकरी कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार यांनी १९७९ मध्ये गावातीलच सर्वे क्र. ७३ मधील १ हेक्टर २१ आर जमीन विठ्ठल मरिबा यांचेकडून विकत घेतली. त्यानंतर एकत्रिकरण योजनेमध्‍ये याचा गट क्रमांक बदलून १९६ झाला. यानुसार कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार यांचा अंमल ७/१२ होणे गरजेचे होते. परंतु त्‍याठिकाणी तत्‍कालीन तलाठी यांनी दुसऱ्याच व्‍यक्‍तीच्या नावे अंमल केला. त्या व्‍यक्‍तीची जमीन जुना सर्वे क्र. ६८ व गट क्र.१८४ मध्‍ये होती. सदर गट क्र.१८४ हा एकत्रिकरण योजनेनंतर झाला परंतु त्‍याची ७/१२ तयार केली नाही. यामुळे शेतकरी कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार यांनी सातबारा नावे होण्यासाठी अर्ज केला. मात्र त्याचा अंमल झाला नाही. मात्र, हार न मानता अर्जदार शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष तहसिल कार्यालय आणि उपअधिक्षक, भूमि अभिलेख कार्यालयात ७/१२ मिळण्यासाठी चकरा मारल्या. दरम्यान, महसूलचे नायब तहसिलदार मारोतराव जगताप यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांनी सखोल चौकशी करत जुने अभिलेख तपासणी केली. तसेच प्रत्‍यक्ष जागेवर उपअधिक्षक, भूमि अभिलेख कार्यालयातील प्रतिनिधीसह भेट देऊन शहानिशा केली. त्यानंतर महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १५५ खाली दिनांक ०८/०२/२०२४ रोजी प्रकरणात निकाल दिला. 

जिद्दी शेतकऱ्यास यंदा सरकारी यंत्रणेची सक्रिय साथत्यानंतर आज, मंगळवारी तहसिलदार आनंद देऊळगाकर यांच्या हस्‍ते शेतकऱ्यास त्‍यांचा ७/१२ देण्यात आला. शेतकऱ्याने तब्‍बल ४५ वर्षानंतर ७/१२ मिळाल्‍याबद्दल तहसिलदार व नायब तहसिलदार यांचे आभार व्‍यक्‍त केले. महसूलचे उल्‍हास जवळेकर, शाम चौधरी, तलाठी गड्डमवार, बोधमवाड, गोपाल माने, मंडळ अधिकारी हायुन पठाण, विकास कदम आदि कर्मचारी अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी दूर केल्या. जिद्दी शेतकऱ्यांना सरकारी यंत्रणेची यंदा सकारात्मक साथ लाभल्याने तब्बल ४५ वर्षांनी न्याय मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेडRevenue Departmentमहसूल विभाग