अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गोदापात्रात कलम १४४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST2021-07-07T04:22:58+5:302021-07-07T04:22:58+5:30
लोहा तालुक्यातील भारसवाडा, अंतेश्वर, पेनूर, बेटसांगवी, शेवडी बा. येळी, कामळज, कौडगाव, चिंचोली, डोंगरगाव, आडगाव, बोरगाव, भेंडेगाव, जवळा, ...

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गोदापात्रात कलम १४४
लोहा तालुक्यातील भारसवाडा, अंतेश्वर, पेनूर, बेटसांगवी, शेवडी बा. येळी, कामळज, कौडगाव, चिंचोली, डोंगरगाव, आडगाव, बोरगाव, भेंडेगाव, जवळा, पळशी, शेलगाव धा. आदी गावांमध्ये गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. हा वाळू उपसा रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र त्याला यश येत नसल्याचे दिसत आहे. खुद्द तहसीलदार यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनीही दुचाकीवर प्रवास करीत या भागातील वाळूमाफियांवर कारवाई केली होती, तरीही वाळू उपसा सुरूच आहे. त्यामुळे आता तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी लोहा तालुक्यातील उपरोक्त गावात गोदावरी नदीपात्रापासून वाहनांना प्रवेश करण्यास २४ जुलैपर्यंत प्रतिबंध केला आहे. या भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.