कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य विमा कंपन्यांनीही लुटले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:19 IST2021-07-28T04:19:19+5:302021-07-28T04:19:19+5:30
विमा रकमेत कपात कारण... रुग्णांनी विमा कंपन्यांकडे दावा केल्यानंतर विविध कारणांनी विमा नामंजूर अथवा भरपाई कमी देण्यात आली. त्यात ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य विमा कंपन्यांनीही लुटले !
विमा रकमेत
कपात कारण...
रुग्णांनी विमा कंपन्यांकडे दावा केल्यानंतर विविध कारणांनी विमा नामंजूर अथवा भरपाई कमी देण्यात आली. त्यात रुग्णालयात भरती होण्याचे निकष रुग्णांनी व रुग्णालयांनी पूर्ण केले नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लगेचच विमा कंपनीस न कळविल्यामुळे रुग्णालय व्हिजिट पूर्ण होऊ शकली नाही. हे कारण देत बहुतांश रुग्णांचा मेडिक्लेम विमा कंपन्यांनी रद्द केला आहे.
केस १ : गजानन पाटील या रुग्णाने एका खासगी बँकेचा विमा काढला होता. परंतु कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे कारण देत त्याचा मेडिक्लेम रद्द करण्यात आला.
केस २ : खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या किरण कोल्हे यांचा त्यांच्या कंपनीमार्फत काढलेला मेडिक्लेम मान्य करून त्यांना कोरोनाकाळात उपचार करण्यासाठी रुग्णालयात लागलेला खर्च विमा कंपनीने अदा केला आहे.