शाळा ऑनलाईन, तरी शाळांकडून १०० टक्के फीसाठी तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:14 IST2021-06-20T04:14:23+5:302021-06-20T04:14:23+5:30
शंभर टक्के फी कशासाठी दीड वर्षापासून शाळांकडून शिक्षणाचे ऑनलाईन धडे दिले जात आहेत. परंतु, फीसाठी तगादा लावला जात आहे. ...

शाळा ऑनलाईन, तरी शाळांकडून १०० टक्के फीसाठी तगादा
शंभर टक्के फी कशासाठी
दीड वर्षापासून शाळांकडून शिक्षणाचे ऑनलाईन धडे दिले जात आहेत. परंतु, फीसाठी तगादा लावला जात आहे. शिक्षकांचे पगार, इतर मेंटेनन्स खर्च, वीजबिल शाळांना अत्यल्प लागत आहे. मग, शंभर टक्के फीसाठी तगादा कशासाठी, असा प्रश्न पडतो. विद्यार्थ्यांना जोपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, तोपर्यंत शाळांनी फी घेऊच नये अथवा २० ते २५ टक्केच घ्यावी. - मंगेश शिंदे, पालक.
कोविडमुळे शिक्षणाचा फज्जा उडाला आहे. त्यात अनेक शाळांकडून ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट सुरू केली आहे. काही शाळा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवतही असतील. परंतु, विद्यार्थी शाळेत येत नसल्याने बहुतांश खर्च कमी होऊन शाळेच्या पैशाची बचतच झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून १०० टक्के फी वसुलीसाठी तगादा का लावला जात आहे. - अशोक देवकर, पालक.
शाळा ऑनलाईन असली, तरी खर्च येतोच
शाळा ऑनलाईन असल्या तरी इंटरनेटसह डिजिटल शिक्षण पद्धतीसाठी खर्च येतोच. हे पालकांनी लक्षात घ्यावे. आजघडीला आम्ही २५ टक्के सवलत दिली आहे. - गिरीश जाधव, संस्थाचालक
ऑनलाईन शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम राबविण्यात येतात. शाळा जागा भाडे, वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार आदींसाठी नियमितपणे संस्थांना पैसे लागतातच. ज्या शाळांना अनुदान नाही, अशा शाळा प्रशासनाने कुठून चालवायच्या. त्यामुळे पालकांनी फीसाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे. - अदित्य देवडे, संस्थाचालक