शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चिमुकल्यांमुळे शाळा परिसर गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:15 IST

दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर नवीन दप्तर, ड्रेस, वॉटर बॅग, वह्या पुस्तके, सोबत घेवुन नव्या उत्साहात मुलांची पावले शुक्रवारी शाळांकडे वळली़ शाळेच परिसर विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलून गेला होता़ मित्र, मैत्रिणी भेटणार या आशेने काही विद्यार्थी आनंदात, तर पुन्हा अभ्यास, झोपमोड यामुळे काहीजण कंटाळलेले दिसत होते़ आई-वडीलांचा हात सोडताना मनाची चलबिचल झालेल्या अनेक चिमुकल्यांनी तर भोकाड पसरुन शाळेचा पहिला दिवस साजरा केला़

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव: पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप, पालकांची उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर नवीन दप्तर, ड्रेस, वॉटर बॅग, वह्या पुस्तके, सोबत घेवुन नव्या उत्साहात मुलांची पावले शुक्रवारी शाळांकडे वळली़ शाळेच परिसर विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलून गेला होता़ मित्र, मैत्रिणी भेटणार या आशेने काही विद्यार्थी आनंदात, तर पुन्हा अभ्यास, झोपमोड यामुळे काहीजण कंटाळलेले दिसत होते़ आई-वडीलांचा हात सोडताना मनाची चलबिचल झालेल्या अनेक चिमुकल्यांनी तर भोकाड पसरुन शाळेचा पहिला दिवस साजरा केला़सुट्टीत गावी, मामा, नातेवाईकांकडे मनसोक्त मजामस्ती केल्यानंतर काहींशा जड पावलांनीच शुक्रवारी जिल्हाभरात विद्यार्थ्यांनी शाळा गाठली़ पहिल्याच दिवशी आपल्या पाल्यांना वेळेवर शाळेत पोहोचविण्यासाठी पालकांची तारांबळ उडाली होती़ शाळेत आल्याानंतर नवीन वर्ग, वर्गशिक्षक, नविन मित्र, मैत्रिणी, आपला बाक कोणता असेल या बाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती़ एकमेकांना नवीन वस्तु दाखविण्यात अनेक विद्यार्थी दंग झाले होते़ अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे फुले, चॉकलेट देवुन स्वागत करण्यात आले़---चिमुकल्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार का?मुलांच्या किलबिलाटात शुक्रवारी जिल्हयात शाळांना सुरुवात झाली़ पहिला दिवसा असल्यामुळे कुणाच्या पाठीवर दप्तराचे फारसे ओझे दिसले नाही़ परंतु दप्तर हलके व्हावे यासाठी शाळांनी कुठलेही प्रयत्न केले नसल्याचे आणि प्रशासनानेही वॉच ठेवणारी यंत्रणा उभारली नसल्याचे आढळुन आले़ त्यामुळे दप्तराचे ओझे कितपत कमी होईल ? या बाबत शंका उपस्थित होत आहे़ मागील शैक्षणिक वर्षात या विषयावर न्यायालयाने दखल घेत शासनाला दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत निर्देश दिले होते़ त्यावर शिक्षण विभागाने नव्या सत्रापासून ओझे कमी करण्यात येईल असे सांगितले होते़---फुलांनी झाले विद्यार्थ्यांचे स्वागतजिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांमध्ये शुक्रवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलांनी स्वागत करण्यात आले़ पहिलाचा दिवस असल्यामुळे अनेक स्कुलबस विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आल्याच नव्हत्या़ त्यामुळे आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकानांच चांगलीच कसरत करावी लागली़ सध्या शालेय साहित्याचे दर वाढले असल्यामुळे यंदा शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांना अधिकचे पैसे मोजावे लागले़ अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक स्वागत कमानी उभारल्या होत्या़ पहिला दिवस असल्यामुळे काही शाळांनी प्रवेशोत्सव झाल्यानंतर सुट्टी दिली होती़

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाStudentविद्यार्थी