‘सहस्रकुंडा’तून ७ पर्यटकांना वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:20 IST2017-09-14T23:17:54+5:302017-09-14T23:20:52+5:30

सहस्त्रकुंड धबधब्याचे पाणी अचानक वाढल्याने सात पर्यटक मध्यभागी अडकले. या सर्वांना तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात पोलीस व महसूल प्रशासनाला यश आले. 

Save 7 tourists from Sahstrunkunda waterfall | ‘सहस्रकुंडा’तून ७ पर्यटकांना वाचविले

‘सहस्रकुंडा’तून ७ पर्यटकांना वाचविले

ठळक मुद्देअचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना मध्यभागातून बाहेर निघणे अवघड झाले.दोरीच्या सहाय्याने सातही पर्यटकांना तीन तासांच्या प्रयत्नानंतर  सुखरुप बाहेर काढण्यात आले.

इस्लापूर (जि. नांदेड) : सहस्त्रकुंड धबधब्याचे पाणी अचानक वाढल्याने सात पर्यटक मध्यभागी अडकले. या सर्वांना तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात पोलीस व महसूल प्रशासनाला यश आले. 
पर्यटकात श्यामराव झिंगू राठोड (७०, रा़राजगड), कांताबाई चव्हाण (४०, रा़बोधडी), जनार्दन गायकवाड (२२, रा़चिखलीकर), संदीप ग्यानबा नरवाडे (राग़ोकुंदा ), रविराम राठोड (२७, रा़चिंचोली), तोतीबाई राठोड  (७०, रा़बोधडी), गोची बळीराम जाधव (रा़मुरली) यांचा समावेश होता. इस्लापूरपासून चार कि़मी़ अंतरावर असलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून  पर्यटक येत असतात. गुरुवारीही बरेच पर्यटक धबधबा परिसरात होते. यातील ७ जण धबधब्याची धार पाहण्यासाठी मध्यभागी उभे होते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना मध्यभागातून बाहेर निघणे अवघड झाले. येथे अडकलेल्या सात पर्यटकांत ५ पुरूष व २  महिलांचा समावेश होता. सातही जण जीव मुठीत घेऊन मदतीची याचना करीत होते. हा प्रकार बाहेर उभ्या पर्यटकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रथम इस्लापूर पोलिसांना या घटनेची माहिती 
दिली. पोलीस उपनिरिक्षक विक्रम विठूगोने, गोपनीय शाखेचे योगेश कोकणे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर सरोदे  आदी घटनास्थळी लगेच पोहोचले. 
बचाव कार्यासाठी  मदत करणारे भोई, देविदास भटेवाड, दिलीप तुमलवाड, विवेकानंद पाटील, संभाजी झाडे, नामदेव राठोड, अरविंद राठोड, सदिंप काळे, सयाजी टेकलवाड, साईनाथ वासेवाड यांना सोबत घेवून  दोरीच्या सहाय्याने सातही पर्यटकांना तीन तासांच्या प्रयत्नानंतर 
सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. 
 घटनेची माहिती मिळताच किनवटचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार नरेंद्र देशमुख, मंडळ अधिकारी लोढे इस्लापूरचे स.पोनि रामेश्वर कायंदे या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली़

Web Title: Save 7 tourists from Sahstrunkunda waterfall