सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:17 IST2021-01-22T04:17:08+5:302021-01-22T04:17:08+5:30

चौकट ........ असा आहे आरक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील १६ तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारी रोजी सकाळी ११ ...

Sarpanchpada reservation draw program announced | सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

चौकट ........

असा आहे आरक्षण कार्यक्रम

जिल्ह्यातील १६ तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. यामध्ये २८ रोजी नांदेड, भोकर, हदगाव, किनवट, धर्माबाद, बिलोली, देगलूर व कंधार तालुक्यांसाठी, तर २९ जानेवारी रोजी अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, उमरी, नायगाव, मुखेड व लोहा तालुक्यांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

चौकट ...........

ग्रामीण भागात आरक्षण सोडतीबाबत उत्सुकता

जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींसाठीची निवडणूक पार पडलेली असून निकालही लागलेला आहे. आता नवनियुक्त सदस्यांबरोबरच ग्रामस्थांनाही सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीबाबत उत्सुकता लागली आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये एकहाती सत्ता आली असली तरी अनेक ठिकाणी संमिश्र उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे सरपंच पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गाला सुटते, त्या प्रवर्गाचा उमेदवार आपल्या पॅनलमधून निवडून आला आहे का, याबाबतही आडाखे बांधले जात आहेत.

Web Title: Sarpanchpada reservation draw program announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.