शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मस्साजोग हत्या प्रकरण; कपाळापासून ते घोट्यापर्यंत मुकामार, अंतर्गत रक्तस्त्रावाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:44 IST

शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक माहिती समोर

बीड : केज तालुक्यातील मस्साजोग हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे प्राथमिक कारण समोर आले आहे. यामध्ये आरोपींनी सरपंचाला वाहनातच कपाळापासून ते घोट्यापर्यंत वायररोपने आणि बुक्क्यांनी मुकामार दिला. त्यामुळे वरून जखम दिसत नसली तरी डोक्यात, फुफ्फुसासह यकृत आणि इतर अवयवयांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाला. यामुळेच सरपंचाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचा केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यासह जयराम माणिक चाटे (वय २१, रा. तांबवा, ता. केज), महेश सखाराम केदार (२१, रा. मैंदवाड, ता. धारूर), सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (तिघेही, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा आंधळे (रा. मैंदवाडी, ता. धारूर) यांचा आरोपी म्हणून सहभाग आढळला आहे. यातील जयराम, महेश आणि प्रतीक हे तिघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. परंतु, यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह इतर चार आरोपी अजूनही मोकाटच आहेत. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह वेगवेगळी पाच ते सहा पथके रवाना झालेली आहेत. तसेच याच प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, देशमुख कुटुंबीयांच्या भेटीसाठी सत्ताधारी, विरोधक जात आहेत. त्यांच्याकडून आरोपींचा शोध घेऊन कडक शासन करण्याची मागणी केली जात आहे. शिवाय पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड शोधणे, विशेष यंत्रणेमार्फत तपास करणे, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. सध्यातरी हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

आरोपींना कठोर शासन व्हावे - धनंजय मुंडेसंतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी व गंभीर स्वरूपाचे आहे. या स्वरूपाची गुन्हेगारी ही समाजविघातक असून, अशा वृत्तीला वेळीच ठेचले गेले पाहिजे. यासाठी या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना कठोर शासन केले जावे. देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे, असे आ. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरूवारी पत्र पाठवले आहे.

अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानेच मृत्यूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत शवविच्छेदन करण्यात आले होते. यामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानेच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. याचा सखोल अभ्यास केला जात आहे.- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड