शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Biyani Murder: अद्याप तपासाची ठोस दिशाच निश्चित नाही;प्रत्येक कारणांची खातरजमा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 11:57 IST

Sanjay Biyani Murder तपासात फारशी प्रगती नसली तरी विविध स्वरूपाची माहिती गाेळा केली जात आहे. त्याच्या विश्लेषणाअंती पुढील दाेन-चार दिवसांत सर्वकाही स्पष्ट हाेईल, असा दावा पाेलीस प्रशासनाकडून केला जात आहे.

नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder) यांची मंगळवारी भरदिवसा सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरासमाेर दुचाकीवरून आलेल्या दाेन अज्ञात मारेकऱ्यांनी गाेळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेवरून दाेन दिवस लाेटल्यानंतरही नांदेड पाेलिसांची झाेळी रिकामीच आहे. अद्याप तपासाची ठाेस दिशाच निश्चित झाली नसल्याची माहिती आहे.

संजय बियाणी यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले आहे. ही हत्या नेमकी काेणत्या कारणावरून झाली असावी, याचा शाेध पाेलीस घेत आहेत. पुढे येणाऱ्या प्रत्येक कारणांची खातरजमा केली जात आहे. रेकाॅर्डवरील ५२ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन घटनेच्या २४ तास आधी ते नेमके काेठे हाेते, याची चाैकशी केली जात आहे. मात्र, पाेलिसांना अद्याप खुनाचे कारण व मारेकरी काेण याचा सुगावा लागू शकलेला नाही. तपासात फारशी प्रगती नसली तरी विविध स्वरूपाची माहिती गाेळा केली जात आहे. त्याच्या विश्लेषणाअंती पुढील दाेन-चार दिवसांत सर्वकाही स्पष्ट हाेईल, असा दावा पाेलीस प्रशासनाकडून केला जात आहे. एसआयटीची पाच पथके वेगवेगळ्या मुद्द्यावर तपास करीत आहेत. सध्या सीसीटीव्ही, माेबाईल टाॅवर लाेकेशन याद्वारे माहिती मिळविली जात असून तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी त्याचे विश्लेषण शुक्रवारपासून केले जाणार आहे.

मारेकऱ्यांनी वापरले विनाक्रमांकाचे वाहनमारेकरी काेठून आले, काेणत्या मार्गाने गेले यासाठी सीसीटीव्हीची तपासणी केली गेली. त्यांनी विनाक्रमांकाची दुचाकी वापरल्याचेही आढळून आले. पाेलीस महानिरीक्षक निसार तांबाेळी, जिल्हा पाेलीस अधीक्षक प्रमाेदकुमार शेवाळे तपासातील प्रगतीचा सतत आढावा घेत आहेत. अप्पर पाेलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडे एसआयटीचे नेतृत्व साेपविले गेले असून परिक्षेत्रात डिटेक्शनमध्ये तज्ज्ञ मानले जाणाऱ्या पाेलीस अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

थेट महासंचालकांनी तपासावर लक्ष ठेवावेगुरुवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी मुंबईत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पाेलीस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेतली. संजय बियाणी यांच्या हत्येची घटना गंभीर आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खुनामागील नेमका हेतू काय, हा खून करणारे व त्यांचे सूत्रधार काेण, ते तातडीने पकडले जावेत, महासंचालकांनी स्वत: या तपासावर लक्ष ठेवून सतत आढावा घ्यावा, अशी मागणी ना. चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू