शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संजय बियाणींच्या हत्येच्या कटासाठी नांदेडचा दादा परभणीत? निनावी लेटर बॉम्बने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:32 IST

Sanjay Biyani Murder: हिंदी भाषेत अन् मोडक्या-तोडक्या शब्दात हे पत्र आहे. त्यात बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत रचला असा उल्लेख आहे

नांदेड- येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder ) यांच्या हत्येला आठवडा लोटला आहे. परंतु अद्यापही पोलिसांच्या हाती विशेष काही लागले नाही. त्यात बियाणी यांच्या घरी आलेल्या निनावी पत्रामुळे मात्र खळबळ उडाली आहे. या पत्रात बियाणींच्या हत्येचा कट परभणीत रचला असून त्यासाठी नांदेडातील एक दादा परभणीत आला होता असा हिंदीतून मजकूर आहे. त्यामुळे खरेच हत्येचा कट परभणीत रचला की पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कुणी हे पत्र पाठविले याचा तपास सुरु आहे.

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या घरासमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सीसी टिव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर असल्याचे दिसून येते. या प्रकरणात पोलिसांकडून सीसी टिव्ही फुटेज आणि इतर माहितीचे विश्लेषण सुरु आहे. त्यात आता बियाणी यांच्या घरी आलेल्या निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे. स्पीड पोस्टने सोमवारी दुपारी बियाणी यांच्या घरी धडकले होते.

काय आहे निनावी पत्रातहिंदी भाषेत अन् मोडक्या-तोडक्या शब्दात हे पत्र आहे. त्यात बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत रचला आहे. आनंद नगर येथील एक मोठा दादा त्यासाठी परभणीला होता. त्याने अगोदर एकाच्या मुलाला मारले होते. तो मोठा रेती माफिया आहे. बिल्डरच्या कामात कोणी राहू नाही, असा उद्देश होता. असा मजकूर पत्रात आहे.

पोलिसांचा तपास भरकटविण्याचा प्रयत्ननिनावी आलेल्या या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. परंतु हे पत्र पोलिसांचा तपास भरकटविण्याचा प्रयत्नही असू शकतो. कदाचित पोलिस प्रकरणाचा उलगडा करण्याच्या जवळ पोहचले असतील. त्यामुळे एखाद्याने हा खोडसाळपणा करुन लक्ष्य विचलित करण्याचा प्रयत्न तर केला नाही? अशीही शंका घेतली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूNandedनांदेड