औषधी दुकानातून ३० रुपयांच्या आयव्ही सेटची जादा दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST2021-04-19T04:16:03+5:302021-04-19T04:16:03+5:30
अन्न व औषध विभागाचे साहाय्यक आयुक्त व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी औषधी दुकानदारांकडून होणारी रुग्णांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी चांगल्या गुणवत्तेच्या ...

औषधी दुकानातून ३० रुपयांच्या आयव्ही सेटची जादा दराने विक्री
अन्न व औषध विभागाचे साहाय्यक आयुक्त व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी औषधी दुकानदारांकडून होणारी रुग्णांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी चांगल्या गुणवत्तेच्या आयव्ही सेटचीही ३० रुपये इतक्या माफक दरामध्ये विक्री करण्याबाबत विक्रेत्यांना आवाहन करावे, अशी मागणी प्रसाद वाघमाेडे यांनी केली आहे.
चौकट............
प्रसाद वाघमोडे यांचे अन्न व औषध प्रशासनाला निवेदन
ठोक औषध विक्रेत्यांच्या तपासणीची केली मागणी
अवघी २० ते २५ रुपये खरेदी किंमत असलेला आयव्ही सेट मनमानीपणे वारेमाप दरात विक्री करून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकाची आर्थिक लूट केली जात असून अन्न व औषध प्रशासनाने स्वत: तपासणी करून शहानिशा करावी, अशी मागणीही प्रसाद वाघमोडे यांनी केली आहे. त्यासाठी शहरातील काही ठोक औषधी विक्रेत्यांच्या दुकानांची नावेही त्यांनी निवेदनात नमूद केली आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री यांनाही निवेदनाची प्रत दिली आहे.