महावितरणच्या गोदामातून साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:13 IST2021-07-03T04:13:04+5:302021-07-03T04:13:04+5:30
गुरुद्वारा भागातून दुचाकी चोरी गुरुद्वारा गेट क्रमांक २ परिसरातून चोरट्याने शरणपालसिंघ दीपसिंग बंड यांची दुचाकी (एम.एच.२६, एवाय ३९६२) लंपास ...

महावितरणच्या गोदामातून साहित्य लंपास
गुरुद्वारा भागातून दुचाकी चोरी
गुरुद्वारा गेट क्रमांक २ परिसरातून चोरट्याने शरणपालसिंघ दीपसिंग बंड यांची दुचाकी (एम.एच.२६, एवाय ३९६२) लंपास केली. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
नाथनगरात घरासमोरून ट्रक लांबविला
शहरातील नाथनगर भागात घरासमोर उभा केलेला दहा लाख रुपये किमतीचा ट्रक चोरट्याने नेला. ही घटना १ डिसेंबर २०२० रोजी घडली होती. त्यात २०२१ मध्ये गुन्हा नोंद झाला. या प्रकरणात जयश्री शिवराज बुरपल्ले यांनी ठाण्यात तक्रार दिली.
४४ हजारांच्या साहित्याची चोरी
लोहा तालुक्यातील मौजे वाका येथे शेतातील विहिरीवरची मोटर, स्टाटर, वायर आणि पाईप असे एकूण ४४ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. ही घटना २७ जूनला घडली. या प्रकरणात मारोती गंगाराम झुलवाड यांनी ठाण्यात तक्रार दिली.
फवारणीचा पंप, सौर पॅनल लांबविले
हदगाव तालुक्यातील शिरड येथे शेतातील फवारणीचा पंप आणि सौर पॅनल असे दहा हजार रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आले. या प्रकरणात अंकुश दाजीबा कल्याणकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला.
एक लाखासाठी विवाहितेचा छळ
मुखेड तालुक्यातील सावरगाव येथे विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन गाडी घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणात मुखेड ठाण्यात गुन्हा नेांद झाला.