सफाई कामगार आजपासून संपावर

By Admin | Updated: July 10, 2017 00:32 IST2017-07-10T00:28:54+5:302017-07-10T00:32:49+5:30

नांदेड : उद्या सोमवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मराठवाडा नप, मनपा कामगार कर्मचारी युनियन लालबावटाच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाईल.

Safari Kamgar from today's strike | सफाई कामगार आजपासून संपावर

सफाई कामगार आजपासून संपावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महानगरपालिका प्रशासनाने अधिकारी - कर्मचाऱ्यांप्रमाणेच तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कंत्राटी, रोजंदारीवरील सफाई कामगारांचे थकित वेतन अदा करावे, अन्यथा उद्या सोमवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मराठवाडा नप, मनपा कामगार कर्मचारी युनियन लालबावटाच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाईल.
मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे दोन महिन्यांचे थकित वेतन एका दिवसात एका तासात अदा केले आहे. त्यांच्या या विक्रमी निर्णयाचे संघटनेच्या वतीने स्वागत स्वागत केले आहे.
त्याचवेळी कंत्राटी सफाई कामगारांच्या बाबतीत ही तत्परता दाखवावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Safari Kamgar from today's strike