शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दु:खदायक !; पुतणीच्या लग्नासाठी वऱ्हाडाला बोलाविण्यास गेलेल्या काकाचा विहिरीत पडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:32 IST

सर्वांनी लग्नासाठी तयार रहा असा निरोप देण्यासाठी वधूचे काका मोठ्या उत्साहाने पहाटेच गावात गेले. मात्र, अंधारात अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. अविनाश रायपुलवार असे या दुर्दैवी काकाचे नाव असून ही घटना हदगाव तालुक्यातील कवाणा येथे घडली.

नांदेड : लहानपणापासून जिला आपल्या अंगाखांद्यावर खेळवले, भावाच्या मृत्यूनंतर जिच्या आनंदासाठी कष्ट घेतले, त्या पुतणीचे आज लग्न. या आनंदाच्या क्षणात सारे गावच वऱ्हाडी होते, सर्वांनी लग्नासाठी तयार रहा असा निरोप देण्यासाठी वधूचे काका मोठ्या उत्साहाने पहाटेच गावात गेले. मात्र, अंधारात अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. अविनाश रायपुलवार असे या दुर्दैवी काकाचे नाव असून ही घटना हदगाव तालुक्यातील कवाणा येथे घडली.

पूजा विष्णुकांत रायपुलवार हिचे आज लग्न आहे. शिवणकाम करणाऱ्या तिच्या वडिलांचा सहा महिन्यापूर्वी हृद्यविकाराने मृत्यू झाला आणि त्या पाठोपाठ आईचाही मृत्यू झाला. यानंतर पूजाचे काका अविनाश यांनी तिच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. स्वतः मुलबाळ नसल्याने अविनाश यांनी मोठ्या लाडात पूजाला सांभाळेल होते. यामुळे लाडक्या पुतणीसाठी त्यांनी मोठ्या उत्साहाने नांदेड येथील मुलाचे स्थळ बघितले. कमवता जावई व चांगले घराणे असल्याने ते या लग्नासाठी खूप आनंदी होते. लग्नाची सारी तयारी त्यांनी स्वतः लक्ष घालत केली.  

पूजाचे लग्न मुलाकडे नांदेड येथे करण्याचे ठरले होते. आज सकाळी १०.३० वाजताची विवाहाची वेळ होती. अविनाश यांनी वऱ्हाडी म्हणून साऱ्या गावाला आमंत्रित केले. सकाळी लवकर लग्न असल्याने ते पहाटेच गावात जाऊन सर्वांना लवकर तयार रहा असा निरोप देत होते. निरोप देण्याच्या घाईत त्यांना रस्त्यालगतची जुनी विहीर दिसली नाही व ते यात ते पडले. विहिरी कोरडी होती मात्र यातील खडकावर पडल्याने त्यांच्या डोक्याला व छातीला मार लागला होता. त्यांना गावकऱ्यांनी लागलीच हदगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. येथेच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वधूस लग्नासाठी केले तयार अचानक ओढवलेल्या या गंभीर परिस्थितीत गावकऱ्यांनी काही जवळच्या व्यक्तींना वधूच्या नातेवाईकांसह  लग्नासाठी नांदेडला पाठवले. यावेळी वधूला काका केवळ जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत असे सांगण्यात आले. मात्र, सहा महिन्यांपूर्वीच आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या पूजास आता काकाच्या जाण्याचे दु:ख पचवावे लागेल. मोठ्या आनंदाने पुतणीच्या लग्नाची तयारी करणाऱ्या अविनाश यांचा तिच्या लग्नाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूmarriageलग्नAccidentअपघातNandedनांदेडhospitalहॉस्पिटल