शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

दरोड्याच्या तयारीतील आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:14 IST

शहरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी लूटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ त्यामुळे पोलिसांनी शहरात गस्त वाढविली आहे़ विमानतळ व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाचप्रकारे दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी पकडले आहे़

ठळक मुद्देआठ जणांना पकडले : अंधाराचा फायदा घेत दोघे पळालेआरोपींकडून धारदार शस्त्रे जप्त

नांदेड : शहरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी लूटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ त्यामुळे पोलिसांनी शहरात गस्त वाढविली आहे़ विमानतळ व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाचप्रकारे दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी पकडले आहे़ त्यांच्याकडून धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत़ तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेवून पसार झाले़विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महेबूबनगर नवीन बायपास ते देगलूर नाका रस्त्यावर तोंडाला रुमाल बांधून काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विनायक शेळके यांना मिळाली होती़ शेळके यांनी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास या परिसरात सापळा रचला़ यावेळी अचानक आरोपींवर धाड मारुन त्यांना पकडण्यात आले़शेख सलीम शेख अब्दूल रज्जाक राफ़ारुख नगर, संतोष ऊर्फ चिंग्या साईनाथ तरटे राख़ोब्रागडे नगर, योगेश ऊर्फ पप्या प्रदीप गजभारे राख़ोब्रागडेनगर या तिघांना पोलिसांनी पकडले़ तर साईनाथ माधवराव गजलवाड रा़सखोजीनगर व सय्यद जाकीर रा़महेबुबनगर हे दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले़ पोलिसांनी या आरोपीकडून दरोडा टाकण्याच्या साहित्यासह दोन खंजीर, एक लोखंडी हातोडा जप्त केला़ या प्रकरणी पोउपनि विनायक शेळके यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़तर दुसरी घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली़ लालवाडी अंडरब्रीज जवळ काही जण दबा धरुन बसले होते़ शिवाजीनगरचे सपोनि करिम खॉन सत्तार खॉन पठाण यांनी फौजफाट्यासह त्या ठिकाणी धाड मारली़यावेळी आरोपीजवळ शस्त्र, काठ्या, लोखंडी सळई, दोरी हे दरोडा टाकण्याचे साहित्य आढळून आले़पोलिसांनी या ठिकाणाहून शेख इस्माईल शेख गुलाम हुसेन रा़ दुलशहा रहिमानगड, धोंडिबा बालाजी सूर्यवंशी रा़ राजेशनगर तरोडा नाका, राष्ट्रपाल ऊर्फ छटाक्या दिलीप जावळे रा़ आंबेडकरनगर, शेख मोबशिर शेख आमेर रा़ नवी आबादी, आकाश ऊर्फ बाळ्या सखाराम कांबळे रा़ जयभीमनगर या पाच जणांना अटक केली़ त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के यांनी भेट दिली़युवकाला लुबाडणारा पोलिसांच्या जाळ्यातलातूर फाटा परिसरात एका तरुणाला तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडील ५६ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीच्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत़९ एप्रिल रोजी रात्री लातूर फाटा परिसरातून जाणा-या दिगांबर रामराव लोंडे यांना अजय भगवान माने याने अडविले होते़ यावेळी माने याने लोंडे यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख सहा हजार रुपये आणि सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ५६ हजारांचा ऐवज पळविला होता़आरोपी माने याला गुन्हे शोध पथकाचे पोउपनि शेख जावेद, पोहेकॉ़मोकले, पोना़मलदोडे, केंद्रे, पोकॉ़नागरगोजे, गुंडेकर यांच्या पथकाने वसरणी भागातून ताब्यात घेतले़ या आरोपीकडून परिसरात घडलेले आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़लुटीच्या अनेक घटनानांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको, लातूर फाटा, कौठा, साई कमान आदी परिसरात गेल्या काही दिवसांत सातत्याने लुटीच्या घटना घडत आहेत़ दुचाकीवरुन जाणाऱ्यांना अडवून खंजीरचा धाक दाखवित त्यांच्याकडील ऐवज पळविला जात आहे़ सातत्याने घडणा-या या घटनामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरुन जाणा-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाtheftचोरी