शिवाजीनगरात रस्ते रूंदीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:11+5:302021-06-04T04:15:11+5:30
घरेही बांधून देण्याचा प्रस्ताव पुढे आला असून याबाबत मालमत्ताधारकांची महापालिकेत गुरुवारी बैठकही घेण्यात आली. पालकमंत्री व काँग्रेस नेते अशोक ...

शिवाजीनगरात रस्ते रूंदीकरण होणार
घरेही बांधून देण्याचा प्रस्ताव पुढे आला असून याबाबत मालमत्ताधारकांची महापालिकेत गुरुवारी बैठकही घेण्यात आली.
पालकमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे निवासस्थान शिवाजीनगर भागात आहे. या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. देशभरातील नेते चव्हाण यांच्या निवासस्थानी येत असतात. यावेळी होणारी
वाहतुकीची कोंडी व इतर प्रश्न लक्षात घेता शिवाजीनगरातील दोन रस्त्यांचे रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या आणि परिसरातील मालमत्ताधारकांना पक्की घरे बांधून
देण्याबाबतचाही प्रस्तावही तयार केला आहे. निवासी गाळे तसेच व्यापारी संकुलाची निर्मिती करून स्थानिकांना ती उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नई आबादी या भागातील जवळपास ६० घरे बाधित होणार आहेत.
त्यांना निवासी गाळ्यात आहे त्या जागेइतकीच निवासी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यातून या भागाचा विकास केला जाईल. सदर जागेत व्यापारी संकुलही तयार केले जाणार आहे. या सर्व आराखड्यात
परिसराचा संपूर्ण विकास होऊन या भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या
सर्व आराखड्याबाबत बाधित मालमत्ताधारकांची गुरुवारी महापालिकेत आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे बैठक घेण्यात आली. यावेळी स्थायी समितीचे सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले, विजय येवनकर, नगरसेवक
शेरअली आदींची उपस्थिती होती. बाधित मालमत्ताधारकांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
त्यामुळे आगामी काळात शिवाजीनगर भागातील दोन रस्ते रूंद होणार आहेत. त्याचवेळी नई आबादीचा कायापालट होईल, असा विश्वास सभापती गाडीवाले यांनी व्यक्त केला.