शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

महसूल मांडतेय मेगा कंपनीची बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:18 AM

राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर येथील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीतील शासकीय धान्य घोटाळ्यात महसूल प्रशासनाकडून संबंधित कंपनीची बाजू मांडण्यात येत असल्याचा ठपका सीआयडीने ठेवला आहे़

ठळक मुद्देसीआयडीने ठेवला ठपका पोलिसांनी जबरदस्तीने ट्रक नेले नसल्याचे मांडले म्हणणे

शिवराज बिचेवार।

नांदेड : राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर येथील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीतील शासकीय धान्य घोटाळ्यात महसूल प्रशासनाकडून संबंधित कंपनीची बाजू मांडण्यात येत असल्याचा ठपका सीआयडीने ठेवला आहे़ तसेच या प्रकरणात तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी योग्य कारवाई केली नसल्याचेही तपासात नमूद केले आहे़ त्यामुळे वेणीकरांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे़कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणात अजय बाहेती, प्रकाश तापडीया, कंत्राटदार राम पारसेवार, दमकोंडवार व ट्रकचालक यांनी नियोजनबद्धरित्या शासकीय धान्याचा काळाबाजार केल्याचे सीआयडीचा तपास सांगतो. कंपनीत गेलेल्या दहा ट्रकपैकी ७ ट्रक हे हिंगोली जिल्ह्याचे होते़ त्या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी याबाबत गुत्तेदाराला ६१ लाखांचा दंड ठोठावला होता़ रेशनिंगच्या धान्याची ५० किलो प्रतिबॅग ही ओळख मिटवून टाकण्यासाठी त्यातील धान्याचे मुद्दाम वजन बदलण्यात आले होते़ शासकीय धान्याचे दहा ट्रक हे काळाबाजार करण्यासाठीच मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत गेले होते़ पोलिसांनी ते बळजबरीने कंपनीत नेले नसल्याची बाब सीआयडीच्या तपासातही पुढे आली आहे़ त्यामुळे महसूल प्रशासनाने पोलिसांवर केलेला आरोप या ठिकाणी चुकीचा ठरविण्यात आला आहे़ त्याचबरोबर वेणीकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जात इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीने २०१६ मध्ये माल कोठून खरेदी केला होता़ सदर कंपनीमध्ये २०१५ साली महसूल विभागाने पंचनामा केला होता़ या बाबी नमूद करुन कंपनीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचा ठपका सीआयडीने अहवालात ठेवला आहे़या प्रकरणात आतापर्यंत १९ आरोपींना अटक केली आहे़ तसेच रेशनिंगच्या धान्याचे किती ट्रक कंपनीत गेले होते, याचा तपास सध्या सुरु आहे़ दरम्यान, बुधवारी बिलोली न्यायालयात वेणीकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे़ मोहम्मद रफिक या कार्यकर्त्याने वेणीकर यांना जामीन देवू नये, याबाबत याचिका दाखल केली होती़जीपीएस नसलेल्या वाहनातूनच काळाबाजारस्वस्त धान्य वितरण प्रणालीचे किती ट्रक आहेत आणि त्यापैकी किती जणांवर जीपीएस ट्रॅकींग सिस्टीम बसविली आहे़ याबाबत सीआयडीकडून तपास सुरु आहे़ ज्या वाहनांमध्ये जीपीएस बसविलेले नाही त्या वाहनाद्वारे धान्य पाठविण्यात आले आहे़ जीपीएस यंत्रणा नसलेल्या, हिरवा रंग दिला नसलेल्या व स्वस्त धान्य वितरण प्रणाली वाहतुकीच्या वाहनावर आवश्यक असणारा मजकूर या वाहनावर नव्हता़ अशाच वाहनांनी हे धान्य पाठविण्यात आल्याचेही सीआयडीने आपल्या अहवालात नमूद केले आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडNanded policeनांदेड पोलीस