सेवानिवृत्त जवानाने महिलेचा गळा चिरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:24+5:302021-06-01T04:14:24+5:30
सेवानिवृत्त जवानाचा या मयत महिलेसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या वादाचे पर्यवसान सोमवारी सकाळी खुनाच्या घटनेत झाले. ...

सेवानिवृत्त जवानाने महिलेचा गळा चिरला
सेवानिवृत्त जवानाचा या मयत महिलेसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या वादाचे पर्यवसान सोमवारी सकाळी खुनाच्या घटनेत झाले. बुरकलवाडी येथील सेवानिवृत्त जवान सुरेश धनसिंग राठोड (वय ५०) यांचा गावातील बेबीताई भीमराव चव्हाण (४५) या महिलेसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद होता. त्यावरून नेहमी त्यांच्यामध्येे भांडण होत असे. सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास महिला घरासमोर असताना सुरेश राठोड याने बेबीताई यांचे डोके पकडून कत्तीने गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बेबीताई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात खळबळ उडाली. खुनाच्या घटनेनंतर आरोपी राठोड हा स्वत:हून इस्लापूर पोलीस ठाण्यात हजर झाला, तसेच पोलिसांना महिलेचा खून केल्याचेही सांगितले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि सुशांत किनगे हे करीत आहेत.