उमरीत योगशिक्षकाचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST2020-12-07T04:12:22+5:302020-12-07T04:12:22+5:30
दररोज पहाटे येथील रेल्वे स्थानकावर शहरातील नागरिकांना योग, प्राणायाम व विविध प्रकारची आसने आदींचा सराव ...

उमरीत योगशिक्षकाचा सत्कार
दररोज पहाटे येथील रेल्वे स्थानकावर शहरातील नागरिकांना योग, प्राणायाम व विविध प्रकारची आसने आदींचा सराव गोविंद अट्टल हे करून घेत आहेत. त्यामुळे अनेकांच्या मधुमेह, हृदयाचे विकार आदी व्याधी कमी झाल्या असून निरोगी जीवन जगण्याचा एक मार्ग सापडला आहे. त्याबद्दल सर्व योग साधकांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक अनिल दर्डा, संजीव सवई, भगवानदास आसावा, गोविंद केते, गोपाल राठौर , प्रदीप अग्रवाल, प्रकाश तुमकुंटे, सूर्यकांत पबीतवार , राजेश वर्मा , गजानन श्रीरामवार , राजेश दर्डा, बालाजी पुपुलवाड, संजय बुंदेलकर , रियाज पठाण , रफीक शेख, अकलवाड , सय्यद आजम आदींची उपस्थिती होती.