‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:17 IST2021-01-22T04:17:13+5:302021-01-22T04:17:13+5:30
याप्रसंगी हिंदू जनजागृती समिती तर्फे यंदा तिरंगा असलेले मास्कची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने तिरंगा मास्कची विक्री हा ...

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम
याप्रसंगी हिंदू जनजागृती समिती तर्फे यंदा तिरंगा असलेले मास्कची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने तिरंगा मास्कची विक्री हा एकप्रकारे ध्वजसंहिते नुसार राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याचे आणि ‘राष्ट्रगौरव अपमान निवारण अधिनियम १९७१’ उल्लंघन असल्याने अशा प्रकारे होणारी तिरंगा मास्कची विक्री आणि वापर आढळून आल्यास तसे करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली गेली.
यासोबतच विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनानी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करून त्यामध्ये सामाजिक संस्थांना सहभागी करून घेणे, यामध्ये हिंदू जनजागृती समितीला सुद्धा सहभागी करून घेणे, यापूर्वी भिवंडी आणि जळगाव येथे कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये समितीच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात आलेले आहे, जिल्ह्यात कुठेही प्लास्टिक च्या राष्ट्रध्वजाची उत्पादन आणि विक्री होत नाही ना याची खात्री करावी आणि तसे होत असल्यास संबंधित उत्पादकांवर कारवाई करावी, जिथे शक्य आहे तिथे समितीला शाळांमधून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या विषयी व्याख्यान, प्रश्नमंजूषा घेण्यास अनुमती द्यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या.
हिंदू जनजागृती समिती तर्फे मागील १९ वर्षे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम राबवली जाते आणि या अंतर्गत शाळा – महाविद्यालयातून व्याख्याने – प्रश्नमंजूषा घेणे, हस्तकपत्रके आणि भित्तीपत्रकांच्या माध्यमातून, फ्लेक्स लावून जागृती करणे, रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे इत्यादी कृती केल्या जातात.
नागरिकांचे प्रबोधन व्हावे यासाठी हिंदू जनजागृती समिती तर्फे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ ही ध्वनीचित्रफित बनविण्यात आलेली आहे ती स्थानिक केबल वाहिन्यांवर दाखविण्यासाठी अनुमती द्यावी अशी मागणी सुद्धा या वेळी करण्यात आली.
विविध ठिकाणी दिलेल्या निवेदनामध्ये परभणी येथे धर्मप्रेमी संदीप देशमुख, महेश स्वामी, मंदार कुलकर्णी, सेलू येथे श्रीराम समितीचे अक्षय हुगे, कृष्णा काटे, विशाल लांडगे, कृष्णा गलांडे उपस्थित होते. नांदेड येथे धर्मप्रेमी पुरभाजी तिडके, राम वाघमारे, नागेश बुंदेले उपस्थित होते.