शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

१३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:08 IST

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे होत असलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या १३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी लागला आहे़ १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पाच लाभधारकांना आॅनलाईन मावेजाचे वाटप करुन पैसे वितरणाची सुरुवात करण्यात आली. मावेजाचा प्रश्न निकाली निघाल्याने आता धरणाच्या कामाला गती मिळणार आहे़

ठळक मुद्देमुखेड तालक्यातील लेंडीप्रकल्प शेतकऱ्यांना दिलासा, ५ जणांना आॅनलाईन मावेजा, मुक्रमाबादेत फटाके

मुखेड/ मुक्रमाबाद : मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे होत असलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या १३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी लागला आहे़ १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पाच लाभधारकांना आॅनलाईन मावेजाचे वाटप करुन पैसे वितरणाची सुरुवात करण्यात आली. मावेजाचा प्रश्न निकाली निघाल्याने आता धरणाच्या कामाला गती मिळणार आहे़महाराष्ट्र व तेलंगणा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने इ.स. १९८४ मध्ये लेंडी धरणाची निर्मिती करण्यात आली. या धरणात मुक्रमाबाद येथील १३१० घरे बुडीत क्षेत्रात संपादित करण्यात आली. मागील ३५ वर्षांपासून लेंडी प्रकल्पग्रस्तांना मावेजा मिळाला नसल्याने येथील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली़ याच मागणीसाठी शेतकऱ्यांनी मुक्रमाबाद बाजारपेठही बंद ठेवली होती़ तसेच २०१८ मध्ये या लाभधारकांनी मावेजा मिळावा म्हणून बेमुदत उपोषणही केले होते.दरम्यान, मागील ३ वर्र्षात या प्रकल्पासाठी शासनाकडून १७६ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत़ १ नोव्हेंबर २०१८ रोजी जलसंपदामंत्री यांनीही मावेजाची रक्कम तातडीने देण्याबाबतचा शब्द विधिमंडळात दिला होता़ त्यानुसार १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे झालेल्या बैठकीनंतर १३१० कुटुंबांना ९३ कोटींच्या मावेजाचे वाटप आॅनलाईन प्रणालीद्वारे करण्यास सुरुवात झाली. मुक्रमाबाद येथील वॉर्ड क्रमांक १ मधील माणिक रानबा कांबळे, विठ्ठल अमृत जाधव, शशीकपूर गंगाधर तेलंग, रुक्मिणबाई नागोराव गायकवाड, सूर्यकांत रामराव मुक्रमाबादकर या ६ लाभधारकांना ७७/१ च्या नोटिसा बजावून आॅनलाईन पद्धतीने मावेजाही देण्यात आला. दरम्यान, या प्रक्रियेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.बाजारपेठही बंद

  • धरणात मुक्रमाबाद येथील १३१० घरे बुडीत क्षेत्रात संपादित करण्यात आली. मागील ३५ वर्षांपासून लेंडी प्रकल्पग्रस्तांना मावेजा मिळाला नसल्याने येथील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली़ याच मागणीसाठी शेतक-यांनी मुक्रमाबाद बाजारपेठही बंद ठेवली होती़
  • १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे झालेल्या बैठकीनंतर १३१० कुटुंबांना ९३ कोटींच्या मावेजाचे वाटप आॅनलाईन प्रणालीद्वारे करण्यास सुरुवात झाली. मुक्रमाबाद येथील वॉर्ड क्रमांक १ मधील माणिक रानबा कांबळे, विठ्ठल अमृत जाधव, शशीकपूर गंगाधर तेलंग, रुक्मिणबाई नागोराव गायकवाड, सूर्यकांत रामराव मुक्रमाबादकर या ६ लाभधारकांना ७७/१ च्या नोटिसा बजावून आॅनलाईन पद्धतीने मावेजाही देण्यात आला.
टॅग्स :NandedनांदेडDamधरणLendi Lakeलेंडी तलावIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प