मतिमंद असलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडलेल्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील निवासी मूकबधीर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने रविवारी पाठविला आहे.
नरसी निवासी मूकबधीर शाळा बंदचा प्रस्ताव
नांदेड : मतिमंद असलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडलेल्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील निवासी मूकबधीर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने रविवारी पाठविला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या तीन कर्मचार्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. नरसी येथील निवासी मूकबधीर शाळेतील मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर रविवारी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी शाळेला भेट दिली. तसेच त्यांनी पीडित मुलीचीही भेट घेतली. खमीतकर यांनी सदर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव लातूरच्या उपायुक्तांमार्फत पाठविण्यात आला आहे. या घटनेतील पीडित मुलगी ही मागासवर्गीय असल्याने तिला समाजकल्याण विभागाकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्नही केला असल्याचे खमीतकर म्हणाले. तसेच शाळेतील शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रकांत संभाजी बरमे वय ३२, मुजीब बाबुमियाँ शहाजीर वय २७ आणि दवीदास शंकर तिपले वय २७ यांना निलंबित केले आहे. त्यांच्याविरूद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून ते अटक आहेत. या घटनेची गंभीरता लक्षात घेवून शनिवारीही समाजकल्याण विभागाच्या पथकाने शाळेला भेट देवून मुलीचा जबाब नोंदविला होता.
Web Title: A resident resident resident school closed proposal