नुकसानीची माहिती ७२ तासात कळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST2021-09-09T04:23:35+5:302021-09-09T04:23:35+5:30
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात तीन दिवसात मुसळधार पाऊस झाला. अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर काही ठिकाणी नदी-नाल्यांना ...

नुकसानीची माहिती ७२ तासात कळवा
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात तीन दिवसात मुसळधार पाऊस झाला. अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला. त्यामुळे पिके वाहून गेली, जमिनी खरवडल्या. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कंपनीला त्याची माहिती तातडीने देणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्सखलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झाल्यास त्यांचे पंचनामे करण्यात येतात. तसेच विमा कंपनीकडे दावा करता येतो. त्यासाठी पीक नुकसानीची माहिती, पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरुन क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करुन त्यात नुकसानीची माहिती भरावी किंवा १८००१०३५४९० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट- ऑफलाईनही अर्ज करता येणार
काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी मोबाईल ॲप किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे नुकसानीची माहिती न देऊ शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकियो विमा कंपनी किंवा संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबधित कृषी सहायक यांचेकडे ऑफलाईन अर्ज करू शकतात.